भारतात, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत ठेवले जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळतो. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिक निवृत्त झाले आहेत असे गृहीत धरले जाते. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या ६० वर्षानंतरही काम करतात. तथापि, कोणत्याही प्रकारे प्राप्त झालेले उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ज्येष्ठ नागरिकांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही गुंतवणूक योजना आहेत ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक कर वाचवू शकतात. खाली दिलेल्या काही गुंतवणूक योजना ज्येष्ठ नागरिकांचे कर वाचवू शकतात शिवाय गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळवू शकतात. चला तर अशा फायदेशीर 5 गुंतवणूक योजना पाहू.
Table of contents [Show]
1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)
केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. यावर चांगला परतावाही मिळतो. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून या योजनेवरील व्याजदर 7.6% वरून 8% पर्यंत वाढवला आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी किमान कालावधी 5 वर्षे आहे, जो पुढे 3 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. कर सवलतीसाठी, किमान 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
2. टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट (Tax Saving Fixed Deposit)
ही योजना देशातील सर्व बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. तथापि, या योजनेचा व्याज दर प्रत्येक बँकेनुसार बदलतो. एक्सिस बँकेत 7.75%, SBI मध्ये 7.25% व्याजदर आहे. यामध्येही किमान गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा असून एका वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
3. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate)
ही गुंतवणूक योजना ज्येष्ठ नागरिकांना किमान 5 वर्षांच्या कालावधीसाठी कर सूट प्रदान करते. ही केंद्र सरकारी योजना आहे आणि 1 जानेवारी 2023 पासून, व्याज दर 6.8% वरून 7% करण्यात आला आहे.
4. ELSS योजना (ELSS Scheme)
म्युच्युअल फंडाची ELSS योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सूट मिळविण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात किमान गुंतवणुकीचा कालावधी ३ वर्षांचा असतो. या योजनेतील परतावा बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतो. परंतु जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास उत्तम रिटर्न मिळतात.
5. करमुक्त बाँड्स (Tax Free Bonds)
नागरिकांसाठी करमुक्त होण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत सरकारी कंपन्या किंवा संस्थांकडून बाँड जारी केले जातात. या योजनेतील किमान गुंतवणुकीचा कालावधीही 5 वर्षांचा आहे.