By Ankush Bobade03 Mar, 2023 09:505 mins read 252 views
Income Tax Section 80: इन्कम टॅक्स कायदा, 1961 यामध्ये कलम 80 (Section 80) हे विशेष करून करदात्यांना टॅक्समधून सवलत मिळावी यासाठी देण्यात आलेले आहे. यामध्ये कोणकोणत्या खर्चांचा व उत्पन्नाचा समावेश होतो. हे आपण पाहणार आहोत.
सरकारने इन्कम टॅक्स कायद्याच्या विविध कलमांतर्गत भारतातील नागिरिकांना टॅक्समधून सूट मिळावी म्हणून काही तरतुदी केल्या आहेत. ज्याचा आपण लाभ घेऊन टॅक्समध्ये सवलत मिळवू शकतो. तर या तरतुदी काय आहेत, त्या आपण समजून घेणार आहोत. इन्कम टॅक्स कायदा, 1961 यामध्ये कलम 80 (Section 80) हे विशेष करून करदात्यांना टॅक्समधून सवलत मिळावी यासाठी देण्यात आलेले आहे. कलम 80 अंतर्गत गुंतवणुकीपासून, इन्शुरन्स पॉलिसीचे भरलेले हप्ते, होम लोनचा ईएमआय, शैक्षणिक कर्ज आदी पर्यायांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त करदात्यांना कायद्याने आणखी कोणते पर्याय दिले आहेत. ते आपण पाहणार आहोत.
कलम 80C अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी दावा केला जाऊ शकतो. यामध्ये ईपीएफ (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी), पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ), ईएलएसएस (ELSS), सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), ज्येष्ठ नागरिक बचत योजना, टॅक्स सेव्हिंग एफडी आणि मुलांचे शिक्षण शुल्क आदीचा समावेश होतो.
कलम 80CCC अंतर्गत वार्षिक पेन्शन प्लॅन खरेदी किंवा रिनिव्ह्यू करण्यासाठी पैसे भरले असतील तरच या कलमांतर्गत दावा करता येऊ शकतो. हिंदू अविभक्त कुटुंबे (Hindu Undivided Family-HUF) 80CCC अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी पात्र नाहीत.
3. कलम 80CCD पेन्शनमधील योगदान
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80CCD अंतर्गत पेन्शन योजनांसाठी भरलेली रक्कम टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme-NPS), अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana-APY).
4. कलम 80D मेडिकल इन्शुरन्स
इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D अंतर्गत मेडिकल इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रीमियमवर कर सवलत मिळते. या कलमाद्वारे आर्थिक वर्षात 25 हजार रुपयांपर्यंत दावा करता येतो.
कलम 80DD अंतर्गत दोन परिस्थितींध्ये कर सवलतीसाठी पात्र ठरते. एक तर तुम्ही अपंगत्वाच्या उपचारासाठी काही पैसे भरले असतील त्यासाठी आणि दुसरा गंभीर किंवा इतर प्रकारच्या अपंगत्वासाठी केलेला खर्च दाखवून त्याचा कर सवलतीसाठी लाभ घेता येतो.
6. कलम 80DDB मेडिकलवरील खर्च
कलम 80DDB अंतर्गत विशिष्ट आजारांच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाची कर कपातीसाठी सवलत देण्याची तरतूद आहे. या कलमांतर्गत कमाल 40 हजारांपर्यंत सवलत घेता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 60 हजारांपर्यंत आहे.
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कलम 80E अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे. एखाद्या पालकाने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या रकमेवर कर कपातीचा दावा पालकांना करता येतो.
इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत घालून दिलेल्या नियमांमध्ये बसणाऱ्या काही ट्रस्ट, राजकीय पक्ष यांना देणगी देणाऱ्या भारतातील कंपन्यांना या तरतुदी अंतर्गत टॅक्स सेव्हिंगसाठी लाभ घेता येतो.
11. कलम 80GGC राजकीय पक्षांच्या देणग्या
कलम 80GGB प्रमाणेच कलम 80GGC द्वारे ट्रस्ट किंवा राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना टॅक्स सवलतीचा लाभ घेता येतो.
12. कलम 80GG घरभाडे
इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80GG नुसार, तुम्ही भरत असलेल्या घरभाड्यावर टॅक्स सवलत घेण्याची सुविधा आहे. तुमच्या पगारामध्ये घरभाडे भत्ता (House Rent Allowance-HRA) येत नसेल तर तुम्ही भरत असलेल्या घरभाड्याच्या रकमेतील 60,000 रुपयांपर्यंत रक्कम कर कपातीसाठी दावा करू शकता.
13. कलम 80TTA बचत खात्यावरील व्याज
प्राप्तीकर कायद्याच्या (Income Tax Act) कलम 80 TTA द्वारे बचत खात्यातील गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षी 10,000 पर्यंत टॅक्स सवलतीचा लाभ घेता येतो. हा लाभ वैयक्तिक करदाता आणि हिंदू अविभक्त कुटुंबे यांना घेता येतो.
14. कलम 80TTA आणि 80TTB उत्पन्नावरील व्याज
कलम 80TTA आणि 80TTB अंतर्गत भाडे, व्याज, लाभांश आणि बक्षिसाद्वारे मिळणाऱ्या रकमेवर कर सवलतीसाठी दावा करता येतो.
इन्कम टॅक्स कायद्यातील अशा विविध कलमांचा आधार घेत तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न करू शकता. यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा या कलमांचा आधार तुम्हाला नीटपणे करता येणार नाही. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमचे एकूण उत्पन्न किती आहे? त्यातून तुमचे नियमित खर्च वजा करा आणि उरलेली रक्कम वर नमूद केलेल्या कलमांप्रमाणे त्याचे विभाजन करून कर सवलतीचा नियमानुसार अधिकाधिक आनंद घ्या.
Tax Saving Options: चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत,जर तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे वाचवायचे असतील, तर तुमच्याकडे कर बचतीसाठी केवळ एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे, उशीर न करता, काही महत्त्वाची गुंतवणूक ताबडतोब करा, कारण कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे.
Tax On Debt Mutual Fund: केंद्र सरकारने वित्त विधेयकात सुधारणा केल्याने दिर्घ कालावधीतील गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांना झटका बसला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून डेब्ट म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीवर इंडेक्सेशन आणि दीर्घकालीन भांडवली नफा कराचा (LTCG) फायदा रद्द करण्यात आला आहे.केंद्राच्या या निर्णयाने म्युच्युअल फंड उद्योगात चिंतेचे वातावरण आहे.
Mutual Fund : जर का तुम्ही 1 एप्रिल नंतर डेट किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कोणत्या फंडमध्ये किती टक्के नफा होणार ? तसेच किती वर्षांसाठी किती पैसे गुंतवणुक केले, तर त्यावर किती टक्के कर आकारला जाणार? या संबंधिची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घ्या.