Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: शिक्षणावर खर्च करताय मग तुम्हाला मिळेल कर सवलत, कशी ते जाणून घ्या

tax saving ideas

टॅक्स सेव्हिंग Ideas - Section 80 E: अनेकजण करियरच्या दृष्टीने परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पालक शैक्षणिक कर्ज काढतात. त्यांना शैक्षणिक कर्जाची परतफेड करताना कर वजावटीचा लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80 ई मध्ये या संदर्भात कर वजावटीची तरतूद करण्यात आली आहे.

मार्च महिना सुरु झाला की पगारदारांची कर बचतीसाठी धावपळ सुरु होते. तुम्ही जर शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर तु्म्हाला हेच कर्ज कर बचतीचा लाभ मिळवून देऊ शकते. होय आयकर कलम 80 ई नुसार तुम्हाला शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम कर वजावट म्हणून मिळते. (Income Tax Section 80 E Tax Exemption)

अनेकजण करियरच्या दृष्टीने परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करतात. मुलांच्या शिक्षणासाठी पालक शैक्षणिक कर्ज काढतात. त्यांना शैक्षणिक कर्जाची परतफेड करताना कर वजावटीचा लाभ मिळू शकतो. आयकर कलम 80 ई मध्ये या संदर्भात कर वजावटीची तरतूद करण्यात आली आहे. ज्यावेळी शैक्षणिक कर्जाची परतफेड सुरु होईल तेव्हापासून कर वजावटीचा लाभ घेता येईल, अशी तरतूद 'आयकर कलम 80 ई' मध्ये आहे. पण एक लक्षात ठेवायला हवे आयकर कलम 80 ई मध्ये मिळणारी कर सवलत ही शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीतील व्याजासाठीच लागू आहे. कर्जाच्या मासिक हप्त्यावर किंवा कर्जाच्या मुद्दल रकमेवर कोणतीही कर सवलत नाही.

सेक्शन 80 ई नुसार मिळणाऱ्या कर वजावटीचा लाभ हा कोणत्याही वैयक्तिक करदात्याला मिळेल मात्र हिंदु अविभक्त कुटुंबाच्या नावे कर सवलत मिळत नाही. स्वत:साठी, जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतल्यास किंवा विद्यार्थ्यासाठी जो कायदेशीर पाल्य असेल अशा कर्जांना कर सवलत लागू होते. पालकांना कर वजावट सहज मिळते. बँका, एनबीएफसी, मान्यता प्राप्त खासगी वित्त संस्था यांच्याकडून घेतलेले शैक्षणिक कर्ज कर वजावटीसाठी पात्र आहे. मैत्रीखातर किंवा नातवाईकांकडून आपसांत घेतलेली आर्थिक मदत कर वजावटीसाठी पात्र नाही.

उच्चशिक्षणासाठी हे कर्ज घेतलेले असावे. भारतात किंवा परदेशात तुम्ही कुठेही उच्च शिक्षण घेत असलात आणि त्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्यासाठी देण्यात येणारी व्याजाची रक्कम कर वजावटीसाठी पात्र ठरेल. विशेष म्हणजे कर वजावटीची कमाल मर्यादा कोणतीही नाही हे आयकर सेक्शन 80 ई चे वैशिष्ट्य आहे. कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराला बँकेकडून त्यासंबधीचे सर्टिफिकेट सादर करावे लागेल. या सर्टिफिकेटमध्ये कर्जाचा मासिक हप्त्याचा तपशील असेल. ज्यात मुद्दल किती आणि व्याजाची रक्कम किती याची माहिती दिलेली असेल. त्यानुसार एका वर्षात कर्जफेडीवेळी दिलेली व्याजाची रक्कम कर लाभासाठी पात्र ठरेल.

'आयकर सेक्शन 80 ई'नुसार किती वर्षांपर्यंत कर वजावट मिळेल

करदात्यांना आयकर सेक्शन 80 ईमध्ये जास्तीत जास्त 8 वर्षांपर्यंत करलाभ घेता येईल. अर्थात ज्यावर्षी कर्जाची प्रत्यक्ष परतफेड कराल तेव्हापासूनचा कालावधी टॅक्स बेनिफिट्ससाठी ग्राह्य धरला जाईल, अशी तरतूद या सेक्शनमध्ये आहे. अर्थात जर तुम्ही शैक्षणिक कर्जाची फेड 8 वर्षांपूर्वीच केली तर तुमचा करलाभ तिथेच संपुष्टात येईल. उदा. एखाद्याने उच्च शिक्षणासाठी काढलेले कर्जाची चांगली नोकरी लागल्यानंतर 4 वर्षी किंवा 5 वर्षी पूर्ण परतफेड केली तर त्याचा करलाभ तिथेच संपुष्टात येईल. त्याला 8 वर्षांपर्यंत करलाभ मिळणार नाही. त्याशिवाय 8 वर्षांनंतरही करलाभ मिळणार नाही. त्यामुळे आयकर सेक्शन 80 ईमधील कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी 8 वर्षापर्यंत कर्जफेड करण्याचा सल्ला दिला जातो.