Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यातील 80D वजावट नेमकी काय आहे?

Income Tax Section 80D

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे कलम 80 अंतर्गत टॅक्स सवलतीचे विविध पर्याय सांगण्यात आले आहेत. यापूर्वी आपण कलम 80C अंतर्गत येणाऱ्या उपविभागांबद्दल जाणून घेतलं. आज आपण 80D अंतर्गत येणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेणार आहोत.

Tax Saving Ideas: आजही भारतातील बहुसंख्य लोक आरोग्य विमा (Health Insurance) काढण्यास प्राधान्य देत नाहीत. त्यांच्या दृष्टिने ही तितकीशी महत्त्वाची गोष्ट नाही. त्यामुळे त्यांना ऐनवेळी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्यावेळी पैशांसाठी गुंतवणूक केलेल्या बचतीवर किंवा कर्जावर अवलंबून राहावे लागते. पण कोरोना संसर्गानंतर लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व कळू लागले आहे. सरकारही सर्वसामान्यांना वैद्यकीय विमा काढून घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सरकार इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D (80d deduction) अंतर्गत टॅक्स सवलतीचा (ITR Return Filing) लाभ देते. कलम 80C अंतर्गतही टॅक्स सवलतीचा लाभ घेतो.

काय आहे कलम 80D? (What is Section 80D)

प्रत्येक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) कलम 80D अंतर्गत कोणत्याही वर्षात भरलेल्या वैद्यकीय विमा प्रीमियमसाठी त्याच्या एकूण उत्पन्नातून वजावटीचा दावा करू शकते. ही वजावट टॉप-अप आरोग्य योजना आणि गंभीर आजारांच्या योजनांसाठी देखील उपलब्ध आहे. कर सवलतीचा हा लाभ फक्त स्वत:च्या आरोग्य विम्यासाठी लागू नाही; तर जोडीदार, मुलं आणि पालकांसाठी (80d deduction for senior citizens) काढलेल्या पॉलिसीसाठी उपलब्ध आहे. यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, कलम 80C अंतर्गत दावा केलेल्या वजावटीपेक्षा जास्त आहे.

कलम 80D अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी कोण पात्र आहे?

मेडिकल इन्श्युरन्सचा प्रीमियम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर खर्च करणारी व्यक्ती किंवा एचयूएफ (हिंदू अविभक्त कुटुंब) कलम 80D अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे. इतर कोणत्याही कॅटेगरीतील लोक या टॅक्स सवलतीचा दावा करू शकत नाही. उदाहरणार्थ, एखादी कंपनी, फर्म.

कलम 80D अंतर्गत मिळणारी टॅक्स सवलत!

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80D अंतर्गत एका आर्थिक वर्षात 25 हजार रूपयांची टॅक्स सवलत मिळते. यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल तर 50 हजार रूपयांपर्यंत सवलत मिळते (80d deduction for senior citizens). सोबतच्या तक्त्यामधून वैयक्तिक करदात्याला कशाप्रकारे टॅक्स सवलत मिळते, याचा आढावा घेऊया.

कलम 80D अंतर्गत विमा धारकाला काय सूट मिळते?

Rule 80D Benefits
  • स्वत:साठी किंवा कौटुंबिक किंवा मुलांसाठी आरोग्य विमा काढला असेल तर त्याला 25 हजार रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सवलत मिळते.
  • जर एखाद्याने पालकांसाठी आरोग्य विमा (इन्श्युरन्स) घेतला असेल तर त्याला 50 हजार रुपयांची टॅक्स सवलत मिळते.
  • विमाधारकाचे वय 60 पेक्षा कमी, तसेच त्याने इतर सदस्यांसाठी पॉलिसी घेतली असेल तर त्याला 25 हजारांपर्यंत सवलत मिळू शकते.
  • इन्श्युरन्स काढणाऱ्या व्यक्तीचे वय 60 पेक्षा अधिक असल्यास त्याला 75 हजार रुपयांची टॅक्समध्ये सवलत मिळू मिळते.