Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीचा IPO साठी सेबीकडे प्रस्ताव दाखल, जाणून घ्या डिटेल्स

Tata Technologies IPO

Tata Group: टाटा समूहाकडून टाटा टेक्नॉलॉजीची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. हा IPO प्रमोटर्स टाटा मोटर्स आणि इतर दोन विद्यमान भागधारकांद्वारे विक्रीची ऑफर असून त्यात शेअर्सच्या कोणत्याही नव्या इश्यूचा समावेश नाही.

टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले की, टाटा मोटर्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीने  आज सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) दाखल केला आहे. 9 मार्च 2023 रोजी त्याचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करण्यात आला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे.

हा IPO ऑफर फॉर सेलद्वारे आणला जाणार आहे. यामध्ये 95,708,984 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. हे कंपनीच्या पेड-अप भाग भांडवलाच्या 23.60 टक्के असणार आहे.  टाटा टेक्नॉलॉजीमध्ये (Tata Technologies) सध्या टाटा मोटर्सची  (Tata Motors) 74.42 टक्के,  Tata Capital Advisors द्वारे मॅनेज  करण्यात आलेली सिंगापूरस्थित गुंतवणूक फर्म अल्फा टीसी होल्डिंग्सची (Alpha TC Holdings Pvt Ltd ) 8.96 टक्के इतकी  आणि टाटा कॅपिटल ग्रोथची (Tata Capital Growth Fund) 4.48 टक्के इतकी भागीदारी  आहे.

टाटा मोटर्सद्वारे (Tata Motors) 81,133,706 शेअर्स,  अल्फा टीसी  होल्डिंग्स 9,716,853 शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ( Tata Capital Growth Fund)  4,858,425 शेअर्स या OFS अंतर्गत विकले जाणार आहेत. हे शेअर्स टाटा टेक्नॉलॉजीजच्या पेड-अप कॅपिटलमधील तीन कंपन्यांच्या शेअर्सचे अनुक्रमे 20  टक्के , 2.40 टक्के आणि 1.20 टक्के इतक्या बरोबरीचे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टाटा मोटर्सच्या बोर्डाकडून  टाटा टेकमधील या निर्गुंतवणूक योजनेला मंजुरी देण्यात आली  होती.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) म्हणजे काय? 

शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक करत असताना आयपीओ हा एक गुंतवणूकीचा पर्याय म्हणून अनेकदा आपल्यासमोर येतो. भांडवली बाजाराच्या दृष्टीने पाहता  IPO हा प्रायमरी तर शेअर बाजार सेकंडरी मार्केट म्हणून ओळखला जातो. आता टाटा समूहाकडून टाटा टेक्नॉलॉजीची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. 9 मार्च 2023 रोजी त्याचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) काय आहे ते जाणून घेऊया.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) हा एक प्रकारचा ऑफर दस्तऐवज असतो जो IPO आणू पाहणाऱ्या कंपनीसाठी तिच्या मर्चंट बँकर्सद्वारे तयार करण्यात येतो. यामध्ये IPO आणू पाहणारी कंपनी आणि तिच्या व्यवसायाबद्दल, आर्थिक स्थितीसंदर्भात तपशीलवार माहिती देण्यात आलेली असते. तसेच, DRHP कंपनीचे प्रमोटर्स, ऑपरेशन्स, आर्थिक स्थिती, गुंतवणूक, उद्योगक्षेत्रातील सहभाग आणि रोल, सूचीबद्ध आणि असूचीबद्ध प्रतिस्पर्ध्यांशी त्याची तुलना याबद्दल देखील संपूर्ण माहिती देण्यात येते.