Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Punch EV : सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूवी 2023 मध्ये होणार बाजारात दाखल

Tata Punch EV

Image Source : www.indiacarnews.com

Tata Punch EV: नेक्सॉन ईव्ही लाँच करून कंपनीने आपला इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर टिगोर आणि टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्यात आले. आता टाटा मोटर्स आपली दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. Tata Punch SUV हे टाटा मोटर्सचे देशातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. पुढील वर्षी ते इलेक्ट्रिक व्हेरीएन्टमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स  (Tata Motors) सध्या देशातील इलेक्ट्रिक वाहने (EV) विकणारी सर्वात मोठी  उत्पादक म्हणून ओळखली जात आहे. नेक्सॉन ईव्ही लाँच करून कंपनीने आपला इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर टिगोर आणि टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्यात  आले. आता टाटा मोटर्स आपली दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. Tata Punch SUV हे टाटा मोटर्सचे देशातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. पुढील वर्षी ते इलेक्ट्रिक व्हेरीएन्टमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. Tata Punch EV पुढील वर्षी भारतात विक्रीसाठी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे मार्केटिंग हेड विवेक श्रीवास्तव यांनी अलीकडेच भारतात पंच EV लाँच करण्याला दुजोरा दिल्याचे वृत्त आहे.  Nexon EV नंतर टाटाच्या दुसर्‍या आगामी इलेक्ट्रिक SUV बद्दल त्यांनी फारसे तपशील अद्याप  उघड केलेले  नाहीत. कंपनी पुढील वर्षाच्या उत्तरार्धात हे मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे. पंच EV ही टाटा मोटर्सची Nexon, Tigor आणि अगदी अलीकडे Tiago EV नंतरची चौथी प्रवासी ईव्ही असणार आहे.

कशी असेल Tata Punch EV

लूक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास पंच EV त्याच्या ICE (इंटर्नल कम्बशन इंजिन) मॉडेलसारखेच असेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, याला इलेक्ट्रिक कारचा खास लुक देण्यासाठी त्यात काही बारीकसारीक बदल केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय यात पेट्रोल व्हर्जनपेक्षा जास्त फीचर्स मिळण्याचीही शक्यता आहे.

Tata Punch EV बॅटरी, किंमत आणि स्पर्धा

पंच EV ही टाटाची पहिली इलेक्ट्रिक कार असेल जी ALFA प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. यात 25 kWh  क्षमतेचा बॅटरी पॅक मिळणे अपेक्षित आहे आणि एका चार्जवर सुमारे 250 ते 300 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करेल.

सर्व-नवीन टाटा पंच EV ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपये असेल असा अंदाज आहे. लॉन्च झाल्यानंतर ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असण्याची शक्यता आहे. पंच ईव्हीची भारतीय बाजारपेठेत कोणाशीही थेट स्पर्धा होणार नाही. पण ते काही प्रमाणात Nexon EV आणि XUV400 ला टक्कर देऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.