Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Projects Freshers Hiring: जगावर मंदीचं सावट असताना टाटामध्ये 400 जागांवर होणार भरती

Tata Job

Image Source : www.newindianexpress.com

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे. टाटा समूहाची Engineering Procurement & Construction (EPC) शाखा असलेल्या Tata Projects या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे.

कोणाची नियुक्ती केली जाईल?

टाटा प्रोजेक्ट्सचे (Tata Projects) मुख्य एचआर अधिकारी गणेश चंदन यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या माहितीनुसार, टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांना नोकरीची संधी दिली जाणार आहे.  या नियुक्त्यांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) मधील 255 पदवीधर समाविष्ट असतील. डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधून नोकरीची संधी मिळणार आहे. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती करण्यात आली होती. ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी उपलब्ध झाली होती.

भरतीसाठी २५ टक्के महिला

टाटा प्रोजेक्ट (Tata Projects Freshers Hiring) कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नवीन टॅलेंटला संधी उपलब्ध करून देतात. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान 5,700 पदवीधरांना कायमस्वरूपी कामावर रुजू केले आहे. कॅम्पसमध्ये भरती करणारे बहुतेक अभियंते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांमधील आहेत. कंपनी प्रीमियर इन्स्टिट्यूटमधील नवीन अभियंत्यांना दरवर्षी सुमारे 17 लाख रुपयांचे मानधन देते. यामधूनच दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांचीही नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के इतकी आहे. कंपनीत पाच वर्षांपूर्वी सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता पण आता हे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. येत्या दोन वर्षांत 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून येत्या काही वर्षांमध्ये 50 टक्के महिलांना नोकरी देण्याचा कंपनीचा मानस आहे.