पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात अव्वल क्रमांक लागतो. साखर निर्यातीतही (Sugar Export) भारत अव्वल आहे. आता साखर उत्पादनाशी संबंधित आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. त्याचाच परिणाम असा झाला की, देशात साखरेचा विक्रमी साठा झाला आहे. दरम्यान इस्माच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन (Sugar Production) विपणन वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे.
Table of contents [Show]
देशातील साखरेचे उत्पादन 120 लाख टन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चालू मार्केटिंग हंगामातील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे आकडे समोर आले आहेत. त्यांच्या मते, देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन इस्माने सांगितले की, भारत हा जगातील साखर उत्पादनात आघाडीवर आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे. साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी 500 साखर कारखान्यांचे गाळप होते, तर यंदा ते 509 पर्यंत वाढले आहे.
राज्यांमधील साखर उत्पादनाची स्थिती
इस्माने राज्यांतील साखर उत्पादनाची माहितीही दिली आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रातील साखर उत्पादन विपणन वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 30.9 लाख टनांवर पोहोचले आहे. कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 26.1 लाख टनांच्या तुलनेत 26.7 लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये 3.8 लाख टन, तामिळनाडूमध्ये 2.6 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये 9.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
365 लाख टन साखर उत्पादनाची शक्यता
मागील मार्केटिंग वर्ष 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये साखरेचे उत्पादन वाढू शकते असा अंदाज आयएसएमए (ISMA - International Securities Market Association) ने व्यक्त केला आहे. 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन 358 लाख टन होते, जे 2022-23 मध्ये 365 लाख टनांपर्यंत वाढेल. साखरेच्या चांगल्या उत्पादनाची स्थिती पाहता केंद्र सरकारही ती निर्यात करण्याचा विचार करेल. त्याचा निर्यातीचा कोटाही निश्चित केला जाईल. विपणन वर्ष 2021-22 मध्ये भारताने विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात केली होती.
साखर निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारत हा ब्राझीलच्या पाठोपाठ जगातील सर्वात मोठा दुसरा साखर उत्पादक देश आहे. भारताने ऑक्टोबर, 2021 ते एप्रिल 2022 या दरम्यान 71 लाख टन साखर निर्यात केली. तर मे महिन्यात 8 ते 10 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विपणन वर्ष 2021-22 मध्ये देशाच्या साखर निर्यातीसाठी 90 लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य होते ते भारताने विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात करुन पूर्ण केले.