Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ethanol Blended Petrol: श्रीलंका आणि बांग्लादेशाने भारतातून इथेनॉल आयात करण्यासाठी दाखवली उत्सुकता

Ethanol Blended Petrol

Image Source : www.newsdrum.in

Ethanol Blended Petrol: बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एकत्र करण्यासाठी इथेनॉलची आयात करतात. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यावर भारताकडून इथेनॉल आयात करण्यास त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

Ethanol Blended Petrol: देशातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय म्हणून इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि खरेदीला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) हे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. गडकरी हे त्यांच्या कामकाजासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी सांगितले आहे की, श्रीलंका आणि बांग्लादेशाने(Sri Lanka and Bangladesh) भारतातून इथेनॉल(Ethanol) आयात करण्यास उत्सुकता दाखवली आहे. एवढेच नाही, तर आपण इथेनॉलसंदर्भात दोन्ही देशांच्या सरकारांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशात इथेनॉल पंप सुरु करण्यावर विचार

सीआयआय(CII) परिषदेत जैव इंधनावर संबोधित करताना गडकरी म्हणाले, मी या विषयावर बांग्लादेशचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या मंत्र्यासोबत चर्चा केली आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एकत्र करण्यासाठी इथेनॉल आयात करतात. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यावर भारताकडून इथेनॉल(Ethanol) आयात करण्यास त्यांनी उत्सुकता दाखवली आहे. याच बरोबर 15 दिवसांच्या आतच गडकरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी(Hardeepsing Puri) यांची बैठक होणार आहे. या बैठकीत देशात इथेनॉल पंप(Ethanol Pump)  सुरू करण्यासंदर्भात नीती तयार करण्यावर चर्चा केली जाणार आहे.

पर्यायी इंधनाच्या वापरास प्रोत्साहन

इथेनॉलचे(Ethanol)  भविष्य अत्यंत चांगले असून देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री झाल्यास, तेलाच्या किंमती कमी होतील असे गडकरी यांचे म्हणणे आहे. कार आणि बाईक सारखी वाहने चालवणाऱ्याना याचा सर्वाधिक फायदा होईल. यामुळे प्रदूषण पातळीही कमी केली होईल व त्याचसोबत पर्यायी इंधनाच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल. सरकार अधिकाधिक इथेनॉल(Ethanol) खरेदी करण्यास उत्सुक आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.