2015मध्ये केंद्र सरकारनं प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरू केली होती. विमा संरक्षण (Insurance coverage) देण्याच्या उद्देशानं या योजना सुरू करण्यात आल्या. ज्यांची एसबीआय, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही बँकांमध्ये खाती आहेत, त्यांच्या या बँक खात्यातून यासाठीची रक्कम वजा होते. यात ऑटो डेबिट (Auto debit) हा पर्याय उपलब्ध असतो. 18 ते 50 वयोगटातल्या नागरिकांनी हा पर्याय खुला ठेवला असेल तेच या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी पात्र ठरतात.
ऑटो-डेबिटमुळे रक्कम वजा
कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. केवायसीचं प्राथमिक स्वरुप म्हणून ते काम करतं. 1 जून ते 31 मेपर्यंत चालणाऱ्या 2 लाख रुपयांच्या जीवन विमा पॉलिसीची 12 महिन्यांची मुदत आहे. ती रिन्यूएबल आहे. हा विमा 2 लाखांपर्यंतच्या जोखमीत कव्हरेज देतो. निवडलेल्या योजनेवर वार्षिक प्रीमियम हा 436 रुपये आहे. प्रत्येक वार्षिक कव्हरेज टर्मच्या 31 मे रोजी किंवा त्याआधी ग्राहकांच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट होणं गरजेचं आहे. ही योजना जीवन विमा कंपनी आणि इतर सर्व आयुर्विमादारांद्वारे दिली जाते. मात्र काही कारणास्तव तुम्हाला ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरू ठेवायची नसेल तर त्याचाही पर्याय उपलब्ध आहे. मात्र ऑटो डेबिटमुळे बँक खात्यातून विशिष्ट रक्कम म्हणजेच प्रिमियमची रक्कम तर डेबिट होत राहते. अशावेळी हा पर्याय तुम्हाला बंद करून ठेवावा लागणार आहे.
...तर आपोआपच रद्द होईल योजना
तुमच्या बँक खात्यातून वार्षिक ऑटो-डेबिटचा पर्याय रद्द करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमचं पीएमजेजेबीवाय (PMJJBY) खातं आहे, त्या बँकेच्या शाखेत जाणं गरजेचं आहे. त्यासाठीची काही प्रक्रिया आहे. ती पूर्ण करून या योजनेचं प्रीमियम पेमेंट थांबवण्याची विनंती बँकेला करू करू शकतात. प्रिमियम वेळेवर पूर्ण न केल्यास तुमची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पॉलिसी आपोआपच रद्द होणार आहे. याशिवाय तुमच्या बँक खात्यात प्रिमियमसाठीची पुरेशी रक्कम नसेल तर या प्रिमियमसाठी आवश्यक असणारी रक्कम ऑटो-डेबिट होऊ शकणार नाबी. त्यामुळे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आपोआपच रद्द होईल.