Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Silicon Valley Bank Crises: हॉलिवुड अभिनेत्री शेरॉन स्टोनला अश्रू अनावर, सिलिकॉन व्हॅली बँक संकटात निम्मी संपत्ती गमावली

Silicon Valley Bank Crash

Image Source : www.canadajournal.net.com

Silicon Valley Bank Crises: आर्थिक संकटात सिलिकॉन व्हॅली बँक अचानक बंद पडली असून त्याचे परिणाम आता अमेरिकेत दिसू लागले आहे. हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोनला सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. या बँक संकटात शेरॉन स्टोनची निम्मी संपत्ती बुडाली. एका जाहीर कार्यक्रमात याविषयी माहिती देताना शेरॉन स्टोनला अश्रू अनावर झाले.

Silicon Valley Bank Crash: सिलिकॉन व्हॅली बँकेच्या संकटामुळे अमेरिकन अभिनेत्री शेरॉन स्टोनने तिचे अर्धे पैसे गमावले आहेत. तिने  स्वतः ही माहिती दिली आहे. तिने बेव्हरली हिल्स येथे कर्करोग संशोधनाकरिता निधी उभारणीसाठी आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली.  त्यावेळी सिलिकॉन व्हॅली बँकेबाबत बोलताना शेरॉन स्टोन हिला अश्रू अनावर झाले. सिलिकॉन व्हॅली बँक अचानक बंद झाल्याने शेरॉन स्टोन यांनी निम्मी संपत्ती गमावली आहे. (I just lost half my money to this banking thing,' tearful Sharon Stone says)   

शेरॉन स्टोन बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध

शेरॉन स्टोन ही हॉलिवुडमध्ये बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध आहे. कॅन्सर रिसर्च फंड कार्यक्रमात तिने तिच्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितले. स्टोन म्हणाली की, 'मला तंत्रज्ञानाची फारशी माहिती नाही. पण मी चेक लिहू शकते, हे या काळातील माझ्यासाठी धाडसाचे कृत्य आहे. कारण मला माहित आहे की काय होत आहे. या बँकिंग संकटात मी माझे अर्धे पैसे गमावले आहेत आणि याचा अर्थ असा नाही की मी आज येथे नाही.'

शेरॉन स्टोनने केला तिचा वैयक्तिक संघर्ष शेअर

स्टोनने तिच्या वैयक्तिक संघर्षांबद्दलही सांगितले. गेल्या महिन्यात त्यांच्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'माझा भाऊ नुकताच मरण पावला आणि याचा अर्थ असा नाही की, मी इथे नाही. आमच्यापैकी कोणासाठीही ही सोपी वेळ नाही. जगात हा एक कठीण काळ आहे.' शेरॉन स्टोन ला कॅन्सर रिसर्च फंड या कार्यक्रमात हे सांगायचे होते की, तिच्या आयुष्यात वैयक्तिक आणि आर्थिक अनेक आव्हाने आहेत, तरी ती आज कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्यास तेथे हजर आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना अधिकाधिक देणगी देण्याचे आवाहन स्टोनने यावेळी केले.

एकामागून एक बँका संकटात

सिलिकॉन व्हॅली बँक ही कॅलिफोर्नियामधील एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेने अनेक स्टार्टअप्सला अर्थसहाय्य केले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला भांडवलाची चणचण जाणवू लागल्याने आर्थिक स्थिती बिघडली आणि नंतर ती बंद करण्यात आली. त्यामुळे 2008 सारख्या आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली. SVB (Silicon Valley Bank) बुडल्यानंतर न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक ही एक मोठी बँक अडचणीत सापडसी. स्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस बँक UBS ने अधिग्रहित केली आहे. तरी या सगळ्यामुळे जागतिक बँकिंग क्षेत्राची चिंता वाढली आहे.

सिलिकॉन व्हॅली बँक 

संभाव्य बँकिंग संकटाच्या पार्श्वभूमीवर यूएस नियामकांनी एक मोठे पाऊल उचलले होते. अमेरिकेतील टॉप 16 बँकांमध्ये समाविष्ट असलेली सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून होती. विशेष म्हणजे, सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) स्टार्टअप विशेषतः तांत्रिक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी ओळखले जाते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आर्थिक संकटाचे आवाज येऊ लागले असताना अमेरिकन नियामकांनी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

(News Source : Business Today, New York Post)