• 05 Feb, 2023 12:23

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Commodity: तुम्ही खात असलेली अंडी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूतून येतायंत, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Shortage of eggs in Maharashtra

Shortage of eggs in Maharashtra: महाराष्ट्रात दररोज १ कोटी अंड्यांचा तुटवडा पडत असून ही पोकळी भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनामधून अंड्यांची खरेदी केली जात आहे.

Shortage of eggs in Maharashtra: 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' असं जर तुम्ही म्हणत असाल तर जरा जपून. सध्या महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा पडत आहे. याची पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कर्नाटक(Karnataka), तेलंगणा(Telangana) आणि तामिळनामधून(Tamil Nadu) अंड्यांची खरेदी केली जात आहे. ही माहिती खुद्द महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या(Animal Husbandry Department of Maharashtra) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा(Shortage of eggs in Maharashtra)

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ धनंजय परकाळे(Dr Dhananjay Parkale) यांनी मंगळवारी(17 जानेवारी 2023) पीटीआयला(PTI) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात दररोज 2.25 कोटींहून अधिक अंडी वापरली जातात. सध्या राज्याची दररोज 1 ते 1.25 कोटी अंडी उत्पादन करण्याची क्षमता आहे, अशातच महाराष्ट्रात दररोज 1 कोटी अंड्यांचा तुटवडा(Shortage of eggs in Maharashtra) पडत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनामधून अंड्यांची खरेदी केली जात आहे.

योजनेसाठी राज्यसरकारकडे प्रस्ताव(Proposal to the State Government for the scheme)

ही टंचाई दूर करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या अनुदानित दराने 50 पांढऱ्या लेघॉर्न कोंबड्या(50 white leghorn chickens) आणि 1,000 पिंजरे देण्याची योजना आखत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विभागाने पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असल्याचेही सांगण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अंड्यांचे दर वाढले आहेत. आजच्या घडीला औरंगाबादमध्ये 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. दोन महिन्यांहून अधिक काळापासून ही किंमती 500 रुपयांच्या(100 अंडी) वर पाहायला मिळत असल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.