Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडिया सीझन 2 हा शो 2 जानेवारी 2023 पासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. बिझनेससंबंधी शो असणाऱ्या ‘शार्क टॅंक इंडिया’ च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहता, दुसऱ्या सीझनची देखील घोषणा करण्यात आली. एवढेच नाही, या शो मधील परिक्षकांदेखील (जजला) तितकीच प्रसिध्दी मिळाली. मात्र आता मागील सीझनमधील परिक्षक अशनीर ग्रोवर यांची जागी अमित जैन यांची वर्णी लागली आहे. चला, पाहुयात कोण आहेत हे अमित जैन.
अमित जैन कोण आहेत?
शार्क टॅंक इंडिया 2 चे नवीन परिक्षक अमित जैन हे मूळचे जयपूर येथील आहे. दिल्ली येथील आयआयटी येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या आईचे नाव नीलम जैन असून, त्या एक गृहिणी आहेत. त्यांचे वडील प्रशांत जैन हे एक पूर्व आरबीआय अधिकारी असून ते एक रत्न व्यवसायिकदेखील होते. 1999-2000 मध्ये, अमितने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर, त्यांनी सुमारे 6 वर्षे 11 महिन्यापर्यंत ट्रायोलाजीमध्येदेखील कार्य केले आहे. अमित यांनी 2008 साली CarDekho (कार देखो) ही वेबसाइट लाँन्च केली. कारदेखो ही वेबसाइट आपल्या यूजर्सला योग्य वाहन खरेदी करण्यासाठी मदत करते.
घराला बनविले ऑफिस
अमित जैन यांनी 2007 साली आपल्या लहान भावासोबत मिळून गिरनारसॉफ्ट नावाची कंपनी स्थापन केली. यासाठी त्यांनी घरालाच ऑफिस बनविले. यानंतर त्यांनी 2008 साली CarDekho (कार देखो) स्टार्टअपची सुरूवात केली. आज ही कंपनी 1200 मिलियन डॉलर (9,840 करोड)ची बनली आहे. अगदी कमी कालावधीतच त्यांना कारदेखोव्दारे प्रचंड यश मिळविले.
कारदेखो (Cardekho) हे नक्की काय आहे?
कारदेखो हे कार खरेदी-विक्री करणारे एक ऑनलाईन पोर्टल आहे. कारदेखो या पोर्टलला अत्यंत कमी वेळेत अधिक प्रसिध्दी मिळाली. यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे मार्केटिंगदेखील केले नाही. आज हेच पोर्टल भारतातील कार विक्रीसाठी नंबर वन ठरले आहे. या स्टार्टअपला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीजवळ 35 लाखांपेक्षा अधिक मंथली यूजर्स आहेत. या पोर्टलवरून महिन्याला 3000 पेक्षा अधिक नवीन गाडयांची विक्री होते.