Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amitabh Bachchan's New Business Plan: अमिताभ बच्चन यांचा नवीन बिझनेस प्लॅन, शार्क टॅंक इंडियासमोर केला सादर

Amitabh Bachchan's New Business Plan

Image Source : http://www.twitter.com/

Amitabh Bachchan's New Business Plan: बॉलीवूडचा शहनशहा अमिताभ बच्चन लवकरच नवीन बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. नुकतेच कौन बनेंगा करोडपती 14 च्या भागात शार्क टॅंक इंडिया 2 ची टीम पोहचली होती. या टीमच्या समोर अमिताभ बच्चन यांनी आपला नवीन बिझनेस प्लॅन सादर केला आहे.

Amitabh Bachchan's New Business Plan: कौन बनेगा करोडपती 14 हा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मोठया दिग्गजांनी हजेरी लावली. त्यात ‘शार्क टॅंक इंडिया’ (Shark Tank India) 2 ची टीमदेखील या शो च्या प्रोमोशनसाठी पोहोचली. या सर्व टीमने अमिताभ बच्चन यांच्यासमोर  एक चांगली रक्कम जिंकली. मात्र या टीमला पाहता, अमिताभदेखील आपला बिझनेस प्लॅन करण्यास शेअर करण्यास मागे राहिले नाही. चला, तर पाहुयात लाखो, करोडों लोकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेता कोणता बिझनेस सुरू करण्याच्या तयारीत आहे?

पहा, अमिताभ बच्चन यांचा नवीन बिझनेस प्लॅन

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कौन बनेगा करोडपतीला मोठा प्रतिसाद आहे. मात्र ही शो आता शेवटच्या मार्गावर आहे. यापूर्वीच लोकप्रिय शो शार्क टॅंक इंडिया (Shark Tank India) 2  शो च्या प्रमोशनसाठी सर्व परिक्षक अमिताभ बच्चन यांच्या केबीसी (KBC) शो मध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना पाहता, अमिताभ यांनी महिलांसाठी ‘एबी टिश्यू’ ने  (AB Tissues) आपला नवीन बिझनेस सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. आपली ही बिझनेस आयडिया शेअर करून त्यांनी आपल्या स्टार्टआप कंपनीसाठी आर्थिक मदत मागितली आहे. अमिताभ म्हणतात की, खास महिलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, एबी टिश्यू. या प्रोडक्टचा फर्स्ट राउंड ट्रायलदेखील झाला आहे. फक्त आपण यामध्ये गुंतवणूक करू शकणार की नाही हे सांगा? हे ऐकून शार्क टॅंक इंडियाची टीमदेखील आश्चर्यचकित झाली. 

शार्क टॅंक इंडिया टीमचा निर्णय 

अमिताभ बच्चन यांचा हा निर्णय ऐकून शार्क टीम इंडियाची टीम म्हणते की, एबी टिश्यू आपण आपल्या नावाने बाजारात आणत असाल, तर 100 करोड तर आम्ही नक्कीच लावू. यानंतर बिग बी (Big B) म्हणतात की, सर एक छोटीशी गोष्ट आहे की, 100 करोड रूपयात  25% साइनिंग अमाउंट मिळेल सर? बिग बी ची ही गोष्ट एकून सर्वांना हसू आवरेना. केबीसी हा शो ऑगस्ट महिन्यात सुरू झाला होता. तेव्हापासून हा शो ची चर्चा होती. आता कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati 14) चा शेवटचा भाग 30 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.