Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2 Registration: जाणून घ्या 'शार्क टॅंक इंडिया'साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

Shark Tank India 2 Registration

शार्क टॅंक इंडिया शो सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होत आहे. कोणी नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल, तर कोणी सुरू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा प्रयत्न करत असेल, तर हा शो आपल्या स्वप्नांना नक्कीच चार चाँद लावेल. येथे आपल्याला योग्य मार्गदर्शनासोबतच मोठी फंडिग ही प्राप्त होईल. यासाठी शार्क टॅंक इंडिया शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करावे हे जाणून घेऊयात.

Shark Tank India 2: जर कोणाला आपल्या व्यवसायासाठी आर्थिक चणचण भासत आहे, तर हा शो आपल्या व्यवसायाला (Business) मोठा हातभार लावेल. फक्त आपला व्यवसाय व या संबंधित भन्नाट आयडिया आपल्याला या शो मध्ये सांगायच्या आहेत. आपली निवड झाल्यास आपल्याला योग्य मार्गदर्शनासोबतच मोठी फंडिग ही मिळेल. म्हणजेच आपला व्यवसाय मोठा होण्यास मदत होईल.

शार्क टॅंक इंडिया 2 शो मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेबसाईट

शार्क टॅंक इंडिया सीझन 2 साठी रजिस्ट्रेशन (Registration) करण्यासाठी आपल्याला sharktank.soniliv.com या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावे लागेल. हा शार्क टॅंक इंडिया Season 2 चा फॉर्म Online Registration कसा भरायचा यांची संपूर्ण प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.  

जाणून घ्या लॉगिन करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम आपण sharktank.sonyliv.com वेबसाइटवर क्लिक करा.
  2. वेबसाइटवर क्लिक करताच, आपल्या स्क्रीनवर OTP व्हेरिफिकेशनचे पेज ओपन होईन.
  3. या पेजवर आपल्याला आपला मोबाईल नंबर अपडेट करावे लागेल. (याचा उपयोग रजिस्ट्रेशनसाठी केला जाईल.)
  4. आपला मोबाईल नंबर अचूक नोंदविल्यानंतर आपल्याला Generate OTP बटनवर क्लिक करावे लागेल.
  5. आता आपल्या मोबाईलवर आपल्याला एक OTP प्राप्त होईल.
  6. हा ओटीपी (OTP) नंबर OTP Verification पेजवर अपडेट करा व कॅप्चा कोड टाका.
  7. कॅप्चा अपडेट केल्यानंतर शेवटी Submit बटनवर क्लिक करा.
  8. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे आपल्याला आपली भाषा हिंदी किंवा इंग्रजीची निवड करावी लागेल.

अटी व नियम जाणून घ्या (Term and Condition)

  1. आता आपल्यासमोर term and condition चे पेज ओपन होईल. येथे सर्व दिशा-दर्शक लक्षपूर्वक वाचा आणि टिक मार्क करून सबमिट (Submit) बटनवर क्लिक करा.
  2.  Submit बटनवर क्लिक केल्यानंतर instructions काळजीपूर्वक वाचा व Start बटनवर क्लिक करा.
  3. आता आपल्यासमोर Profile information भरण्यासाठी नवीन पेज ओपन होईल, येथे आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती अपडेट करावी लागेल. (जसे की, नाव, जन्मदिनांक, मोबाईल नंबर आदि)
  4. सर्व माहिती अपडेट केल्यानंतर Next बटनवर क्लिक करा.

आपल्या बिझनेसबाबत संपूर्ण माहिती भरा

नवीन पेजवर आपल्याला About your business मध्ये आपल्या व्यवसायासंबंधित माहिती अपडेट करावी लागेल.

  • Business Stage
  • Business Category
  • Brand name or Product name
  • Company Registered name
  • About Your Business
  • Executive Summary
  • Website
  • Product Photo
  • Last three months’ Revenue
  • Reasons to go to the Shark Tank India
  • सर्व माहिती अपडेट केल्यानंतर आपल्याला Next बटनवर क्लिक करा


वैयक्तिक माहिती अपडेट करा

1.  आता आपल्याला Personal Information वर आपली वैयक्तिक माहिती अपडेट करायची आहे.

2.  यानंतर शार्क टॅंक इंडिया शो ची माहिती आपल्याला कुठून प्राप्त झाली याबाबत लिहा.

3.   आता Next बटनवर क्लिक करा.

4.   आता आपण Deceleration च्या पेजवर टिक मार्क करून Submit बटनवर क्लिक करा.

5.   आता आपली शार्क टॅंक इंडियाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

6.   जर आपली शार्ट लिस्ट मध्ये निवड झाली असेल, तर आपल्याशी चॅनलकडून संपर्क साधण्यात येईल.

7.   जर आपली निवड झाली तर आपण निवड केलेल्या शहरात आपल्याला ऑडिशन द्यावे लागेल.

8.   ऑडिशनमध्ये आपली निवड झाली तर आपण Shark Tank India या शो मध्ये सहभागी होऊ शकता.

अशा प्रकारे आपण आपल्या बिनझनेससंबंधित नवनवीन आयडिया घेऊन Shark Tank India शो चा भाग बनू शकता व आपले यशस्वी उद्योजकाचे स्वप्न साकार करू शकता.