व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vodafone Idea Limited) शेयर्सने आज 9 जानेवारी रोजी 15 महिन्यांच्या नीचांकी पातळी गाठली आहे. सध्या कंपनीचे शेयर 5 टक्क्यांहून अधिक घसरून प्रति शेयर 7.40 रुपयांवर व्यवहार करत आहे. खरे तर तोट्यात चाललेल्या ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकाकडून निधी मिळवू शकली नाही. आज भारतीय शेयर बाजार तेजीत असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेयर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत.
काय आहे कारण?
अलीकडे कंपनीने स्थानिक बँकांकडून 7000 कोटी रुपयांच्या आपत्कालीन निधीची मागणी केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नैशनल बँक (PNB), HDFC आणि IDFC फर्स्ट बँक या बँकांना Vodafone Idea ने कर्जासाठी संपर्क केला आहोत. परंतु बँकांनी कर्ज देण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. कंपनीवर आगोदरच 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे कर्ज आहे. त्यामुळे बँकांनी कंपनीला कर्ज देणे टाळले आहे. 2016 साली रिलायंस जियोने मार्केट काबीज केल्यानंतर वोडाफोन-आयडीया सातत्याने तोटा सहन करत आहे. या कंपनीची ग्राहकसंख्या देखील दिवसेंदिवस घटत चालली आहे. मागील तिमाही सर्वेक्षणानुसार कंपनीला 7500 पेक्षा अधिकचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीला तब्बल 28,245 करोड रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.
शेयर्सची काय आहे स्थिती
व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे शेयर्समध्ये सातत्याने घसरण होते आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक सुमारे 15 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी गेल्या वर्षभरात सुमारे 50 टक्क्यांनी शेयर्समध्ये घट झाली आहे. एकंदरीत कंपनीची अवस्था डबघाईला आल्याकारणाने गुंतवणूकदारांनी शेयर्स खरेदीला नापसंती दर्शवली आहे.