WhatsApp Update: व्हॉट्सअॅपवर एक अप्रतिम फीचर आले आहे, ज्यामुळे जुने मेसेज शोधणे सोपे होणार आहे. वास्तविक, व्हॉट्सअॅपने आयफोन वापरकर्त्यांसाठी त्यांचे नवीन अपडेट आणले आहे. हे अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.
आयफोन वापरकर्त्यांपुरतेचे मर्यादित फिचर
नवीन अपडेट वापरकर्त्यांना इतर अॅप्समधील फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज(documents) मेसेजिंग अॅपमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करण्याची सुविधा त्यासोबतच चॅटमधील मेसेजमध्ये इतर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसह सामायिक करण्यास अनुमती देते. ही अपडेट सध्या आयफोन वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित आहे, मात्र लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी हे फिचर रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. WhatsApp ने Apple App Store वर iOS वापरकर्त्यांसाठी बिल्ड क्रमांक 23.1.75 सह नवीन स्टेबल अपडेट आणले आहे. यामध्ये वापरकर्त्याला चॅटमध्ये तारखेनुसार विशिष्ट मेसेज शोधण्याची सुविधा मिळणार आहे.
सर्च-बाय-डेट फिचर
iOS वरील WhatsApp वापरकर्ते पूर्वी कीवर्डसह मेसेज शोधण्याचा पर्याय मिळत होता. मात्र आता त्यांना WhatsApp वर सर्च-बाय-डेट फीचर्स मिळणार आहे. या फीचरनुसार सर्च-बाय-डेट फीचर मेसेजिंग विंडोजच्या आत स्क्रोलॅबल मेनूच्या स्वरूपात पाहायला मिळेल. जो वापरकर्त्याला तारीख, महिना आणि वर्ष सेट करण्याचा ऑप्शन देणार आहे. मागील अपडेटमध्ये सुधारणा करून हे नवीन अपडेट तयार करण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ऑनलाईन स्टेटस हाईड करण्यापासून ते स्वतःलाच विंडोमधून मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. मात्र या सर्व सुविधा सध्या काही मर्यादित आयफोनमध्येच देण्यात आल्या आहेत.