Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Whatsapp Banking : पेन्शनधारकांना आता मिळणार 'ही' सुविधा

SBI WhatsApp Banking

पेंशनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे घरबसल्या पेन्शन स्लिप थेट व्हॉट्सएपवर बघता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) खाते असणाऱ्या पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आलीये. आता ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) त्यांची पेन्शन स्लिप (Pension Slip) थेट व्हॉट्सएपवर मिळण्याची सोय बँकेने केली आहे (WhatsApp Banking).  या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिकांचे बँकेचे काम आता अधिक सुसह्य होणार आहे. पेन्शनधारकांना व्हॉट्सएपवरून बँकेला फक्त एक मेसेज पाठवायचा आहे, त्याद्वारे त्यांच्या निवृत्ती वेतन स्लिप घरबसल्या आरामात मिळू शकेल. वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर पेन्शन खात्याच्या बचत किंवा चालू खात्याशी लिंक असल्याची खात्री अगोदर करावी लागणार आहे. 

ही व्हॉट्सएप सेवा खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आणि लहान विवरणे (स्टेटमेंट) मिळविण्यात देखील फायदेशीर ठरणार आहे.

कसा घ्याल या सुविधेचा फायदा?

  • पेंशनधारक ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून +91 9022690226 या क्रमाकांवर ‘Hi’ असा संदेश पाठवायचा आहे. 
  • यानंतर तुम्हाला बँकेकडून तीन पर्यायांसह एक संदेश प्राप्त होईल: बॅलन्स इंक्वायरी (Balance Enquiry), मिनी स्टेटमेंट (Mini Statement) आणि पेन्शन स्लिप (Pension Slip). 
  • पेन्शन स्लिप वर टॅप करा आणि तुम्हाला कोणत्या महिन्यासाठी स्लिप हवी आहे ते नमूद करा.
  • तुम्हाला आता हा संदेश दिसेल: "आम्ही तुमचे पेन्शन तपशील तपासत आहोत, कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा."
  • थोड्या वेळाने तुम्हाला बँकेकडून पेन्शन स्लीप पाठवली जाईल.

पेन्शन स्लिप आणि स्टेटमेंटसाठी ज्येष्ठ नागरिकांना आता बँकेच्या रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाहीये. स्टेट बँक ऑफ इंडियाची ही सेवा तुमच्या आसपासच्या, कुटुंबीयांना जरूर कळवा.