• 28 Nov, 2022 17:46

SBI Business Scheme: 5 लाख रुपये गुंतवा अन् घरबसल्या दरमहा 70,000 रुपये कमवा!

SBI Business Scheme

SBI ATM Franchise : एसबीआय बिझनेस स्कीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे 24 तास इलेक्ट्रिक कनेक्शनसह किमान 80 ते 100 स्क्वेअर फूट जागा हवी.

SBI ATM Franchise : कोणताही व्यवसाय करणे हे सोपे नाही. तसेच व्यवसायासाठी खूप मेहनत आणि प्रयत्नांची आवश्यकता असते. बऱ्याचवेळा मेहनत करूनही लगेच यश हाती येत नाही. परिणामी व्यवसायातून बाहेर पडण्याची नामुष्की येते. पण मग याऐवजी थोडेसे काम करून आणि सुमारे पाच लाख रुपयांच्या रिफंडेबल गुंतवणुकीतून दरमहा 60 ते 70 हजारांची कमाई करता आली तर? तुम्हाला हा व्यवसाय करायला नक्कीच आवडेल ना! आम्ही तुम्हाला एसबीआय एटीएमच्या फ्रँचायजीबद्दल (SBI ATM Franchise) सांगत आहोत.

बाजारात किंवा मॉलमध्ये तुम्ही एसबीआयचे एटीएम पाहत असाल. हे ATM पाहून तुमच्या मनात विचार येत असेल की, ही सर्व ATM’s बॅंकेनेच सुरू केली असतील. पण ते संपूर्ण खरे नाही. बऱ्याच बॅंका या एटीएम बसवण्याचे कंत्राट देतात. कंत्राट घेणारी कंपनी बॅंकेच्या नियमानुसार शहरात, मॉलमध्ये किंवा बॅंक सांगेल तिथे ATM सुरू करण्याची जबाबदारी घेते.

स्पेसिफिट स्टेट बँक ऑफ इंडियाबाबत सांगायचे झाले तर, भारतात एसबीआयचे एटीएम सुरू करण्याचे कंत्राट टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम या कंपन्यांकडे आहे. त्यामुळे एसबीआयची एटीएम फ्रँचायजी घ्यायची असेल तर या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज करावा लागेल. या कंपन्यांचे नियमांची पूर्तता होत असेल तर तुम्हाला या कंपनीकडून एसबीआयचे एटीएम सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

फ्रॉड लोकांपासून सावधान! (Beware of Fraud People)

एटीएम फ्रँचायजीच्या नावाखाली अनेक फ्रॉड कंपन्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्या संबंधितांकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक करत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर अशाप्रकारचे एटीएम सेंटर सुरू करायचे असेल तर सावधगिरी बाळगा आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनच अर्ज (SBI ATM Franchise Official Website) करा.

एसबीआय एटीएम फ्रँचायझी घेण्यासाठी अटी!

एटीएम सेंटर उभारण्यासाठी तुमच्याकडे किमान 50 ते 80 चौरस फुटांची जागा असायला हवी. तसेच या जागेपासून इतर एटीएम सेंटरमध्ये किमान 100 मीटरचे अंतर असावे. जागा मोक्याच्या ठिकाणावरील असावी. तिथे 24 तास वीजपुरवठा असावा आणि किमान 1 किलोवॅट वीज जोडणी बंधनकारक आहे. एटीएम सेंटरची जागा बंधिस्त स्वरूपाची असावी. जर तुमच्याकडे एका सोसायटीत जागा असेल तर तिथे व्ही-सॅट यंत्रणा बसवण्यासाठी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र लागते.

आवश्यक कागदपत्रे (Important Documents)

  • आयडी प्रूफ – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र 
  • पत्ता पुरावा - रेशन कार्ड, वीज बिल, बँकेचे पासबुक
  • फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर 
  • कंपनीला आवश्यक असलेली इतर कागदपत्रे/फॉर्म 
  • जीएसटी क्रमांक

एसबीआय एटीएम सेंटरमधून मिळणारे उत्पन्न! (Earning from SBI ATM)

एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज केल्यानंतर मान्यता मिळाली की, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल म्हणून 3 लाख रुपये जमा करावे लागतात. म्हणजेच एटीएम सेंटरसाठी एकूण गुंतवणूक 5 लाख रुपयांची गुंतवणूक (SBI ATM Franchise Cost) करावी लागते. ही रक्कम कंपनीनुसार वेगवेगळी असू शकते. एटीएम सेंटर अॅक्टिव्ह झाल्यानंतर तिथे होणाऱ्या प्रत्येक रोख व्यवहारासाठी 8 रुपये आणि बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर यासारख्या नॉन-कॅश व्यवहारासाठी 2 रुपये एटीएम सेंटर मालकाला मिळतात.