तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. याद्वारे खातेदारांना UPI पेमेंट करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात असे म्हटले आहे. तसेच ग्राहकांना होणाऱ्या असुविधेसाठी बँकेने दिलीगिरी देखील व्यक्त केली आहे.
ग्राहकांना येतायेत अडचणी
स्टेट बँक ऑफ इंडियाचे देशभरात करोडो ग्राहक आहेत. त्यापैकी कित्येकजण UPI पेमेंटचा वापर आर्थिक व्यवहार करताना करत असतात. सध्या ज्या ग्राहकांनी SBI चे बँक खाते UPI ॲपशी जोडले आहे, त्यांचे पेमेंट यशस्वी होत नाहीये. काही प्रकरणात बँक खात्यातून पैसे वजा झाले मात्र समोरच्याला पैसे पोहोचलेच नाहीत, अशाही काही घटना घडल्या आहेत. आज सकाळपासून अनेक ग्राहकांना या समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 14, 2023
बँकेने दिले स्पष्टीकरण
ग्राहकांना UPI पेमेंट करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बँकेने तत्काळ याबाबत गंभीर दखल घेतली असून. याबाबत कोणत्या तांत्रिक समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी बँक कर्मचारी कामाला लागले आहेत. आम्ही तंत्रज्ञान अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत आहोत असे बँकेने म्हटले आहे. लवकरात लवकर ही समस्या दूर केली जाईल आणि ग्राहकांना पुन्हा UPI पेमेंट सुरळीतपणे करता येईल असे बँकेने म्हटले आहे.
इंटरनेट बँकिंगसाठी देखील अडचणी
शनिवारी दिवसभर इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking) या सेवाचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना देखील पेमेंट करताना अनेक अडचणींचा समाना करावा लागला आहे. महत्वाचे पेमेंट वेळेवर करता न आलेल्या ग्राहकांनी सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त करत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.