Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI WhatsApp Banking पेन्शनधारकांना देत असलेल्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?

SBI WhatsApp Banking

Image Source : www.twitter.com

SBI WhatsApp Banking: एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे.

SBI WhatsApp Banking: एसबीआय(State Bank of India) ही देशातील सरकारी बँकांमधील एक आघाडीची बँक आहे. ग्राहकांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी सध्या SBI ने व्हॉट्सॲप बँकिंग(SBI WhatsApp banking services) सेवा सुरु केली आहे. या सेवेच्या माध्यमातून खात्यातील प्रत्येक व्यवहार, पेन्शन स्लिप(Pension Slip), पेमेंट(Payment) आणि बॅलन्स(Balance Update) अपडेटची माहिती आता ग्राहकांना व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. यासाठी SBI ने व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे. चला तर याबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बँका त्यांच्या सेवा(Services) आणि कोणत्याही बदलांची माहिती ग्राहकांना लगेच मिळावी यासाठी वेगवेगळ्या आधुनिक माध्यमांचा वापरत करत आहेत. याकरिता बँका व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत आहेत. SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग (SBI WhatsApp banking) सेवा सुरू केली आहे.

घरबसल्या मिळेल पेन्शन स्लिप

SBI च्या व्हॉट्सॲप सेवेद्वारे पेन्शनधारकांना घरबसल्या पेन्शन स्लिप(Pension Slip) मिळत आहे. पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनधारकाच्या बचत(Saving Account) किंवा चालू खात्यात(Current Account) जमा केलेल्या पेन्शन पेमेंटचा तपशील(Payment Details) देण्यात आलेला असतो. व्हॉट्सॲपवर पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना SBI व्हॉट्सॲप नंबर +91 9022690226 वर हाय पाठवावे लागणार आहे.

3 वेगवेगळ्या सेवांचा लाभ

निवृत्ती वेतनधारक SBI च्या व्हॉट्सॲप नंबरशी कनेक्ट होताच त्यांना SBI कडून एक शिल्लक चौकशी, मिनी स्टेटमेंट(Mini Statement) आणि पेन्शन स्लिपचा पर्याय दिला जाईल. सदस्यांनी पेन्शन स्लिप पर्याय निवडल्यानंतर महिना देखील प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर त्यांना त्या महिन्याची पेन्शन स्लिप मिळू शकणार आहे.

या नंबरवर मेसेज पाठवून व्हा तुम्हीही सामील

स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) देखील सामान्य सेवांसाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे. त्यासाठी दुसरा व्हॉट्सॲप नंबर जारी केला आहे. SBI च्या WhatsApp बँकिंगमध्ये सामील होण्यासाठी ग्राहकांना WAREG असा मेसेज 7208933148 मोबाईल नंबरवर करावा लागणार आहे. हा मेसेज त्याच नंबरवरून पाठवावा लागेल ज्यावर ग्राहक व्हॉट्सॲप चालवत आहेत.