Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर 5. 72 वर; वर्षभरातील सर्वात कमी नीचांकी

Retail Inflation

Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.

Retail Inflation: सध्या प्रचंड महागाई(Inflation) पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य माणसाच्या गरजेच्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करणे देखील अवघड होत चालले आहे. अशातच सर्वसामान्य माणसांना आनंद देणारी एक बातमी समोर आली आहे. नुकताच सरकारने किरकोळ महागाईचा दर(Retail Inflation) जाहीर केला आहे. चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

किरकोळ महागाईचा दर 5.72 वर

वाढत्या महागाईत सामान्यान्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी बातमी समोर आली आहे. सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला आहे. सरकारच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये(December 2022) किरकोळ महागाईचा दर एका वर्षातील नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला. डिसेंबर हा सलग दुसरा महिना असून जिथे किरकोळ महागाई RBI च्या 4 टक्क्यांच्या टॉलरेंस बँडच्या जवळ आला आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर 6.77 टक्के इतका असून, नोव्हेंबरमध्ये हा दर 5.88 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता.

दूध, अंडी आणि मसाल्याचा दर काय?

डिसेंबर(December 2022) महिन्यात शहरी(City) आणि ग्रामीण(Villages) भागात अन्नधान्याच्या महागाईत थोडी घट झाल्याचे पाहायला मिळाले. याच महिन्यात ग्रामीण भागात खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.05 टक्के नोंदवण्यात आला होता. हाच दर नोव्हेंबर महिन्यात 5.22 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता. तर शहरी भागात डिसेंबर(December 2022) महिन्यामध्ये अन्नधान्यचा महागाई दर 2.80 टक्क्यांवर नोंदवण्यात आला होता, जो नोव्हेंबर महिन्यात 3.69 टक्क्यांवर होता. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर 15.08 टक्क्यांवर नोंदवण्यात आला असून, फळांच्या भाववाढीचा दर 2 टक्के राहिल्याचे पाहायला मिळत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा महागाई दर 8.51 टक्के, अंड्यांचा महागाई दर 6.91 टक्के आणि मसाल्यांच्या महागाईचा दर 20.35 टक्के इतका नोंदवला आहे.