Mukesh Ambani's Succession Plan: भारताच्याच नाही तर जगातील सर्व उद्योजकांसाठी प्रेरणा ठरणारे आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचा(Reliance Industries) पाया रचणाऱ्या धीरुभाई अंबानींचा(Dhirubhai Ambani) आज वाढदिवस आहे. येमेनच्या पेट्रोल पंपपासून ते रिलायन्ससारख्या मोठ्या उद्योगांची स्थापना करणाऱ्या धीरूभाई अंबानींचा प्रवास अतिशय खडतर होता. याच खडतर प्रवासातून धीरूभाईंनी रिलायन्ससारखी मोठी कंपनी उभी केली आणि बक्कळ यशही मिळवलं. पण तुम्हाला माहिती आहे का? धीरूभाईंनी त्यांच्या आयुष्यात एक मोठी चूक केली ज्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना त्याचा त्रास सहन करावा लागला. नेमकी कोणती चूक होती हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
धीरूभाईंनी कोणती चूक केली?
रिलायन्ससारखी(RIL) मोठी कंपनी उभी करून धीरूभाईंनी(Dhirubhai Ambani) बक्कळ यश मिळवलं खरं पण याच कंपनीचा उत्तराधिकारी न निवडण्याची चूक देखील त्यांनी केली. त्यांची दोन्ही मुले त्यांच्या हयातीनंतरही एकत्र राहतील या समजुतीतून धीरूभाईंनी उद्योजचा(Business) उत्तराधिकारी नेमला नाही. त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच मुकेश(Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी(Anil Ambani) यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले. संपत्ती वाटपावरून या दोघांच्यात अनेक वर्ष वाद सुरू होता हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या घटनेतून धडा घेत उद्योगपती मुकेश अंबानींनी त्यांच्या उद्योगाचे उत्तराधिकारी 2022 मध्ये निवडले. यासाठी मुकेश अंबानींनी एका फॅमेली काउंसीलची(Family Counseling) निर्मितीही केली होती.
कधी झाली उत्तराधिकारी पदाची घोषणा?
भारतातील सर्वात मोठी कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(RIL) ची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सप्टेंबरमध्ये पार पडली. त्यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात उत्तराधिकारी पदा संदर्भात घोषणा जाहीर केली. मुकेश अंबानी भलेही उद्योगातून निवृत्त होत नसले तरीही त्यांनी या सभेदरम्यान सर्व शेअर्स होल्डर्सना(Share Holders) यासंदर्भात सूचित केले.
कोण आहे उत्तराधिकारी?
मुकेश अंबानींना तीन मुले आहेत. उद्योगाची विभागणी करण्यासाठी मुकेश अंबानींनी एका फॅमेली काउंसीलची निर्मितीही केली होती. यानुसार सर्वांना सामान वाटा मिळावा हा हेतू होता. RIL च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील घोषणेनुसार मुलगा आकाश(Akash Ambani) जिओमध्ये असलेल्या डिजिटल व्यवसायाचे(Jio Digital) नेतृत्व करेल. ईशाला(Isha Ambani) रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाचे (Reliance Retail Business) प्रमुख म्हणून नियुक्त केले गेले तर, 27 वर्षीय अनंत अंबानी(Anant Ambani) उद्योगातील ऊर्जा व्यवसायाचे(Energy Business) प्रमुख म्हणून काम पाहिलं. मुकेश अंबानी निवृत्त होणार नसून ते आरआयएल(RIL) आणि जिओ प्लॅटफॉर्म(Jio Platform) सारख्या मोठ्या होल्डिंग कंपन्यांचे प्रमुख म्हणून काम करत राहणार आहेत मात्र त्यांनी आपल्या मुलांची भविष्यातील तरतूद करून दिली आहे. वडिलांच्या चुकीतून मुकेश अंबानींनी धडा घेत रिलायन्स उद्योगाचे दायित्व पुढच्या पिढीच्या(Next Generation) हातात सोपवले आहे.