Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dhirubhai Ambani Birthday: जाणून घ्या, पेट्रोल विक्रीपासून यशस्वी उद्योजकाचा प्रवास!

Dhirubhai Ambani Birth Anniversary

Image Source : http://www.frugalentrepreneur.com/

Dhirubhai Ambani Journey: जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असणारे 'रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी' यांचा आज वाढदिवस. येमेनच्या पेट्रोल पंपपासून ते रिलायन्ससारखे मोठे उद्योगांची स्थापना करणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचा जीवनप्रवास जाणुन घेऊयात.

Dhirubhai Ambani Birthday: अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असते. नुकतेच धीरूभाई अंबानी यांची नात ईशा अंबानी यांना जुळी मुले झाल्यानंतर त्या त्यांना घेऊन भारतात दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी अंबानी कुटुंबाने 300 किलो सोने दान केले. त्यांच्या अशाच काही ना काही गोष्टींची हमखास चर्चा होत असते. पण या सर्व गोष्टींचे खरे शिल्पकार असणारे दिवंगत धीरूभाई अंबानी यांचा बुधवारी (दि. 28 डिसेंबर) जन्मदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचा जीवनप्रवास (Dhirubhai Ambani Biography) पाहुयात.

धीरूभाई अंबानी यांचा जन्म कुठे झाला?

धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील जुनागड जिल्हयातील चोरवाड या गावी (Dhirubhai Ambani Birthplace) झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हिरालाल अंबानी, तर आईचे नाव जमनाबेन होते. धीरूभाई अंबानी यांचे वडिल शिक्षक होते. त्यांचे लग्न कोकिलाबेन यांच्याशी झाले होते. त्यांना मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी  (Anil Ambani) ही दोन मुले असून, नीना आणि दीप्ती या दोन मुली आहेत. आज उद्योग क्षेत्रात मुकेश अंबानी हे नाव मोठे मानले जाते. त्यांचे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव सन्मानाने घेतले जाते. 

परिस्थितीनुसार वेगवेगळ्या व्यवसायांची निवड!

घराची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने त्यांना दहावीतच शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मग त्यांनी कुटुंबासाठी रस्त्यावर फळे विकण्यास सुरूवात केली. काहीवेळेला त्यांनी धार्मिक ठिकाणी पकोडेदेखील विकले होते. पण त्यातून फारशी आर्थिक मदत होत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय थांबविला. मग ते आपल्या मोठया भावाजवळ येमेन येथे नोकरीसाठी गेले. सुरूवातीला त्यांनी 300 रूपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी केली. अवघ्या दोन वर्षात ते तिथे व्यवस्थापक पदावर पोहोचले. पण त्यांची बिझनेस करण्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. शेवटी ते भारतात परतले व त्यांनी चुलत भाऊ चंपकलाल दमानींसोबत पॉलिस्टर धाग्यांचा व मसाल्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरू केला.


1971 वर्ष भरभराटीचे आणि प्रगतीचे ठरले!

धीरूभाई अंबनी यांनी अहमदाबादजवळच्या नरोडा येथे 1966 मध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली टेक्स्टाईल मिल सुरू केली. टेक्स्टाईलमधील त्यांचे हे पाऊल खूपच महत्त्वाचे ठरले. 1971 हे वर्ष धीरूभाईंसाठी प्रगतीचे आणि भरभराटीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे या काळातील निर्यात धोरण धीरूभाई अंबानींच्या व्यवसायासाठी अनुकूल ठरत होते. त्याचाच फायदा घेत धीरूभाईंनी परदेशातील वेगवेगळ्या देशांमध्ये जसे की, सौदी अरेबिया, रशिया, पोलंड, झांबिया, युगांडा इथे आपला माल निर्यात करण्यास सुरूवात केली.

रिलायन्सची स्थापना आणि अल्पावधीत मोठी घौडदौड

मुंबई येथील मस्जिद बंदरमधील नरसिंह स्ट्रीटवरील एका छोटयाशा कार्यालयातून रिलायन्स कंपनीचा जन्म झाला. 8 मे 1973 हा तो दिवस होता. रिलायन्सचा अर्थ ‘बहिर्मुख’ असा आहे. म्हणजेच आत्मविश्वासी व उत्साही व्यक्तिमत्त्व जो सर्वांमध्ये राहणे पसंत करतो. धीरूभाईंनी रिलायन्स कंपनी उभी करून स्वत:च्या नावी 62,000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती जमा केली होती. यासोबतच त्यांचा पॉलिस्टरचादेखील व्यवसाय सुरू होता. अशाप्रकारे त्यांनी सातत्याने नवनवीन प्रोजेक्टवर काम करणे पसंद केले. त्यांच्या या कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. होते 6 जुलै 2002 रोजी हृदयविकाराने निधन (Dhirubhai Ambani Death) झाले.