Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance New Brand : रिलायन्सने FMCG क्षेत्रात नवीन ब्रँड 'Independence' लॉन्च केला

Reliance New Brand

Image Source : www.businesstoday.in

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी 'इंडिपेंडन्स' (Independence) हा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.

अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) दैनंदिन वापरल्या जाणार्‍या वस्तू, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी गुजरातमध्ये आपला नवीन ब्रँड 'इंडिपेंडन्स' (Independence) लॉन्च केला आहे. कंपनी संपूर्ण गुजरातमधील FMCG रिटेल विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळेच कंझ्युमर पॅकेज्ड गुड्स ब्रँड 'इंडिपेंडन्स' बाजारात दाखल झाला आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला, रिलायन्सने घरगुती सॉफ्ट ड्रिंक ब्रँड कॅम्पा विकत घेतले होते ज्याचा वापर बहुधा पेप्सिको आणि कोकच्या जोडीला टक्कर देण्यासाठी केला जाईल.

'इंडिपेंडन्स'च्या माध्यमातून खाद्यपदार्थांची विक्री होणार (Food will be sold through 'Independence')

FMCG युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने गुरुवारी गुजरातमध्ये ग्राहक पॅकेज वस्तूंचा ब्रँड 'इंडिपेंडन्स' लॉन्च करण्याची घोषणा केली. कंपनीने सांगितले आहे की ती इंडिपेंडन्स ब्रँडद्वारे खाद्यपदार्थ आणि दैनंदिन घरातील वस्तूंची विक्री करणार आहे. या ब्रँडद्वारे, गुजरातचा FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी 'गो-टू-मार्केट' राज्य म्हणून विकसित करण्याची योजना आहे. लवकरच राष्ट्रीय स्तरावर ब्रँड इंडिपेंडन्स लाँच करण्यात येणार आहे.

ईशा अंबानीने FMCG ब्रँड लॉन्च केला (Isha Ambani launched FMCG brand)

रिलायन्स रिटेलच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “मला आमचा FMCG ब्रँड इंडिपेंडन्स लॉन्च करताना आनंद होत आहे, जे खाद्यतेल, डाळी, तृणधान्ये, पॅकेज्ड फूड उत्पादने आणि इतर दैनंदिन गरजेच्या उत्पादनांची उच्च दर्जाची आणि परवडणारी श्रेणी देते. ईशा अंबानी 45 व्या एजीएममध्ये म्हणाल्या होत्या की कंपनी आपला एफएमसीजी व्यवसाय विकसित करेल. आता ब्रँड इंडिपेंडन्स लाँच करून त्यांनी या दिशेने आपला ठाम इरादा व्यक्त केला आहे.

अनेक कंपन्या खरेदी करण्याची तयारी सुरू आहे (preparing to buy Many companies)

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) व्यवसायाला बळकट करण्यासाठी अनेक कंपन्यांचे अधिग्रहण करत आहे. या दिशेने, दिग्गज FMCG कंपनी CavinKare, Garden Namkeen, Lahori Jeera आणि Bindu Beverages सारखे इतर ब्रँड खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. यासोबतच दक्षिण भारतातील बिस्मीसह अनेक कंपन्या खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.

नवीन स्पर्धक (A new competitor)

रिलायन्स रिटेलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टने लाँच केलेला नवीन ब्रँड ‘Independence’ हा HUL, ITC, पतंजली आणि अदानी विल्मार यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांशी टक्कर देईल.