Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गॅरेंटरशिवाय झटपट कर्ज , 'हा' पर्याय मिळवून देईल तुम्हाला हमखास कर्ज

Loan Against Insurance Policy

Loan Against Insurance Policy: तुमच्या जवळ आयुर्विमा पॉलिसी असेल तर ती तुम्हाला तातडीनं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकते. कर्ज घेतले तरी आयुर्विमा सुरक्षा कायम राहते. शिवाय बँकांच्या कर्जदरापेक्षा विमा पॉलिसीवरील कर्जाचा दर हा तुलनेने कमी असतो.

Loan Against Insurance Policy: आयुर्विमा पॉलिसीमुळे विमाधारकाला सुरक्षा कवच मिळतेच पण आर्थिक संकटात  झटपट कर्जसुद्धा पॉलिसीवर मिळते.आपातकालीन परिस्थितीत तुम्ही एलआयसी किंवा बॅंकेकडून या कर्जाच्या आधारे कर्ज घेऊ शकता. ‘एलआयसी’कडून तुम्ही कर्ज घेतल्यास तुम्हाला हा फायदा मिळतो, की तुम्हाला केवळ किमान व्याज द्यावे लागेल आणि पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर तुम्ही मूळ रक्कम कापून घेण्यास सांगू शकता. मात्र ‘एलआयसी’कडून कर्ज घेताना नेमके कोणते नियम आहेत ते जाणून घेऊया.  

जितके प्रिमियम हप्ते जास्त भरले असतील तितके कर्ज मिळेल जास्त  

'एलआयसी'कडून विमा पॉलिसीवर कर्ज देण्यात येते. हे कर्ज घेताना जामिनदाराची (Guarantor ) गरज भासत नाही. ही प्रक्रिया सोपी असून तातडीने पैसे हवे असल्यास हा पर्याय फायदेशीर ठरतो. त्याशिवाय सरकारी आणि खासगी बँका विमा पॉलिसी तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज देतात.विमा पॉलिसीवर मिळणारे कर्ज तुम्हाला मिळणाऱ्या निश्चित रकमेच्या (Sum Assured) आधारावर ठरते.पॉलिसीमधील जमा रक्कम व बोनस अशी एकूण रकमेच्या तुलनेत 80% ते  90% रक्कम कर्ज दिले जाते.  

कोणत्या पॉलिसीवर मिळेल कर्ज  

एक लक्षात घ्यासगळ्या विमा पॉलिसीवर कर्ज मिळत नाही. जीवन विमा योजनेअंतर्गत मनी बॅक किंवा एंडोमेंट प्लॅनवर कर्जाची सुविधा आहे.या दोन्ही पॉलिसींवर बँकांही कर्ज देण्यास तयार होतात.तुम्ही एलआयसीकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला एक फायदा मिळतो की तुम्हाला कर्ज परत करण्याचा पर्याय मिळतो.या अंतर्गत पॉलिसी मुदतपूर्तीपर्यंत व्याज द्यावे आणि पॉलिसी म्यॅच्युरिटी झाल्यावर मूळ रकमेला त्यातून कापून घेण्यास सांगू शकता.

पॉलिसीवर लोन घेताना लागणारी कागदपत्रे?

विमा पॉलिसी तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला मूळ विमा पॉलिसी, पॉलिसीची कागदपत्रे आणि रद्द केलेला चेक आवश्यक आहे. कर्ज मंजूर करताना एलआयसी किंवा बँक मूळ विमा पॉलिसी ठेवून देतात. जेव्हा कर्जफेड पूर्ण होते तेव्हा मूळ विमा पॉलिसी विमाधारकाला परत केली जाते.

वेळेत कर्ज फेड न केल्यास आर्थिक फटका सोसावा लागेल 

विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीपर्यंत तुम्ही कर्जफेड केली नाही तर तुम्हाला पॉलिसीवरील विमा लाभ गमवावे लागण्याची शक्यता आहे. तुम्ही कर्जाची रक्कम परत न केल्यास कर्जाची रक्कम व्याज आणि गरज भासल्यास विलंब शुल्कासह तुम्हाला मिळणाऱ्या मुदतपूर्तीच्या लाभातून (सरेंडर व्हॅल्यू)वसूल केली जाते. त्याशिवाय काहीवेळा तुमची विमा पॉलिसी रद्द होण्याची शक्यता असते. तुम्हाला कर्जाच्या रकमेसह प्रीमियम देखील भरावा लागू शकतो.