Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personalized Insurance: 'या' कारणांमुळे वैयक्तिक विमा तुमच्यासाठी आहे महत्त्वाचा

Insurance

Importance of Personalized Insurance: कोविड-19 महासंकटात धोके कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले होते.इन्शुरन्स किंवा विमा हा लोकांना उपलब्ध असलेला एक उत्तम संरक्षण उपाय ठरला आहे.

तांत्रिक हस्तक्षेपाने व्यवसायाच्या संवाद पद्धतींमध्ये, ग्राहकांशी ते कशा पद्धतीने जोडले जातात यात बरेच बदल केले आहेत. यामुळे कस्टमायझेशनच्या युगाची सुरुवात झाली आहे, ज्यात व्यवसाय आपल्या ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर आणि नजीकचे संबंध प्रस्थापित करतात.

वैयक्तिक विमा हा विमा क्षेत्रासाठी हा उत्तम पथदर्शक

रिस्क मॅनेजमेंट संदर्भात लोकांचा दृष्टिकोन प्रतिसादात्मक ते सक्रिय असा बदलला आहे.ते कोणत्या प्रकारचा विमा खरेदी करणार या निवडीबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'सगळ्यांसाठी एक' दृष्टिकोन आता विमा कंपन्यांसाठी उपयोगाचा राहिलेला नाही ग्राहकांच्या बदलत्या गरजा परिणामकारकपणे पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक विमा उपयुक्त ठरतो. मागील तीन वर्षात विमा उद्योगाची मोठी वृद्धी झाली आहे. कोरोनानंतर आयुर्विमा आणि विशेष करुन आरोग्य विम्याबाबत नागरिकांचा दृष्टीकोन बदलला आहे. आरोग्य विम्याला प्राधान्य दिले जात आहे. 

विमा उत्पादनांची जागरुकता वाढली (Awareness about Insurance Increased)

आजच्या काळातील ग्राहक फार उत्क्रांत झालेला आहे.अनेक जण रिसर्च ऑनलाइन बाय ऑफलाइन (आरओबीओ) मॉडेलचा अवलंब करतात.अनेक जण त्या उलट म्हणजे रिसर्च ऑफलाइन बाय ऑनलाइन पद्धत अवलंबतात.कोणत्याही पद्धतीत ऑनलाइन हा ग्राहकाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.याचे कारण म्हणजे ग्राहकांच्या डिजिटल संवादातून लक्षणीय प्रमाणात डेटा जमा होतो.पुढे वैयक्तिक पर्याय निर्माण करण्यासाठी याच डेटाचा वापर करता येतो.ग्राहकांना सध्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर वैयक्तिक किंवा पर्सनलाइज्ड पर्याय मिळत आहेत. त्यामुळे आपल्या विमा कंपनीकडूनही त्यांना त्याच प्रकारच्या पर्सनलाइजेशनची अपेक्षा असते.

निवडीचे व्यापक पर्याय (Choice of Customize Product)  

विम्यामध्ये वैयक्तिक/व्यावसायिक धोक्यांच्या आधारावर वैयक्तिक पर्याय असणेही आवश्यक आहे.आरोग्य विम्याच्या बाबतीत तर हे फारच लागू होते. प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य,फिटनेस वेगवेगळा असतो.त्याचवेळी,तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी असंख्य विमा उत्पादनांचे पर्याय उपलब्ध आहेत.त्यामुळे,तुमच्या वैयक्तिक गरजांनुसार तुम्ही विमा उत्पादन खरेदी करू शकता,मग ते संरक्षणात्मक कव्हर असो की गंभीर आजारांसाठीची तरतूद असो.इतकंच नाही,तुमच्या विमा लाभाची मर्यादा वाढवण्यासाठी तुम्ही अॅड-ऑन्सही निवडू शकता.त्यामुळे,तुमच्या खास गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीने विमा योजना कस्टमाइज करता येईल.त्याचप्रमाणे,ग्राहकांचा गाडी चालवण्याचा रेकॉर्ड,वार्षिक मायलेज इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन पर्सनलाइज्ड कार इन्शुरन्स घेता येतो.यासाठी गाडीत बसवलेल्या टेलिमॅटिक्स डिव्हाइसेसचाही उपयोग होतो.

पर्सनलाइज्ड मार्केटिंग ठरतेय गेमचेंजर (Personalize Marketing) 

ग्राहककेंद्री मार्केटिंग ही संकल्पना अजूनही भारतीय विमा क्षेत्रात काहीशी नवी आहे. मात्र, परदेशातील अनुभव लक्षात घेता विमा कंपन्या आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार वैयक्तिक स्वरुपाचे पर्याय देऊ करणाऱ्या कंपन्या अधिक महसूल मिळवू शकतील आणि अधिक प्रमाणात ग्राहकांची संख्या टिकवू शकतील. डेटाचे खासगीपण जपणे ही चिंता कायम असली तरीही संशोधनातील निष्कर्षांनुसार ग्राहकांना स्वस्तात आणि त्यांच्या गरजांनुरुप वैयक्तिक स्वरुपाचे पर्याय मिळणार असतील तर ग्राहक डेटा शेअर करण्यासही राजी असतात. अनेक विमा कंपन्या या संधीचा लाभ घेत आपल्या ग्राहकांसाठी मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहेत. उदा. मेन्यू कार्ड दृष्टिकोनासह आरोग्य विमा देऊ करून ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार योजना निवडण्याची मुभा देणे.