Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फक्त एका मिस्ड कॉलमध्ये मिळेल कर्ज, शेतकऱ्यांसाठी 'PNB'ची खास सुविधा

PNB Scheme

Image Source : www.news18.com

Punjab National Bank Agriculture Loan: पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि माफक अटींवर व्हावी यासाठी ही खास सुविधा आणली आहे ज्यामुळे शेतकऱ्याला कमी त्रासात कर्ज घेता येईल

Punjab National Bank Agriculture Loan: केंद्र सरकार(Central Government) शेतकऱ्यांना आर्थिक मदत(Financial Help) करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. तसेच, देशातील विविध राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी योजनांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना शेती करताना कामी येणारी उपकरणे, बियाणांची(Seeds) गरज असते, ती खरेदी करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान(Subsidy) मिळते. सध्या बँकांनीही शेतकऱ्यांना कर्ज(Loan) देण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. आता पंजाब नॅशनल बँकेने(PNB Bank) शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच(Missed Call) कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला असून पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर(Twitter) हँडलवर शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती सादर दिली आहे. नक्की काय असेल प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

अर्ज कसा करायचा?

  1. पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि माफक अटींवर व्हावी यासाठी ही खास सुविधा आणली आहे ज्यामुळे शेतकऱ्याला कमी त्रासात कर्ज घेता येईल 
  2. शेतकऱ्याला जर कर्ज हवे असेल तर 56070 या नंबरवर Loan लिहून SMS करावा लागेल 
  3. या व्यतिरिक्त 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात 
  4. यासोबतच, नेटबँकिंगद्वारे देखील शेतकरी कृषी कर्जासाठी अर्ज करू शकता
  5. यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्याला कृषी कर्जासाठी अर्ज करावा लागणार आहे

किसान सन्मान निधी योजना

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना(Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देत आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. यासोबत, कृषी सिंचन योजनेत शेतकऱ्यांना शेतीचा विस्तार, पाण्याची बचत आणि सिंचनाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेत ठिबक व फाऊंटन सिंचन तंत्रज्ञानावरही शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. अधिक माहितीसाठी शेतकरी https://pmksy.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवू शकतात.