Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan योजनेची केवायसी मुदत वाढवली; जाणून घ्या अंतिम तारीख आणि केवायसी प्रक्रिया

gov scheme pm kisan yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2022) योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्हीप्रकारे करता येते

PM Kisan eKYC : भारतातील करोडो शेतकऱ्यांना यावर्षी मे महिन्यामध्ये PM Kisan योजनेचा 11 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही; ते तक्रार दाखल करून लाभ मिळवू शकतात. केंद्र सरकारने या योजनेंतर्गत येणाऱ्या 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रूपयांचा हप्ता जमा केला आहे. पण शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी या योजनेंतर्गत केवायसी (pm kisan kyc update) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल. त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत.

केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2022) योजनेंतर्गत लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत वर्षाला 6 हजार रुपये हस्तांतरित करते. केंद्राने आतापर्यंत या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत केली. पीएम किसान योजनेचे पैसे वर्षातून तीनदा हस्तांतरित केले जातात. यापुढील हप्ता आणि इतर सर्व हप्ते नियमित मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची पीएम किसान eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.


KYC करण्याची शेवटची तारीख!

सरकारने पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख आणखी वाढवली आहे. यापूर्वी सरकारने 31 मे पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत सरकारने पुन्हा एकदा वाढ केली आहे. आता पीएम किसान PM KISAN) लाभार्थ्यांना 31 जुलै, 2022 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

PM-Kisan eKYC प्रक्रिया अशी पूर्ण करा?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटच्या होमपेजवर उजव्या बाजूला असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
  • eKYC पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका.
  • आता सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर, 'ओटीपी मिळवा (Get OTP)' या पर्यायावर क्लिक करा. OTP टाकून ही प्रक्रिया पूर्ण करा.


अशाप्रकारे तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. तुम्ही जर 31 जुलैपर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्ही PM Kisan योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही.

PM-Kisan KYC ऑफलाईन प्रक्रिया

PM Kisan योजनेची KYC प्रक्रिया बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून ऑफलाईन केली जाऊ शकते. लाभार्थी शेतकरी नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते मिळविण्यासाठी हे केवायसी आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना ही देशातील शेतकऱ्यांच्या कौटुंबिक आणि शेतीविषयक आर्थिक गरजा पूर्ण करणारी महत्त्वाची योजना आहे.