Pension Plan: जर तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्हाला दरमहा उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, अटल पेन्शन योजना या चारही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभसुद्धा मिळू शकतो. जाणून घ्या, या योजनांबद्दल माहिती.
Table of contents [Show]
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 55 ते 60 वयोगटातील लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये आयकर कलम 80C अंतर्गत कर लाभ दिला जातो. हे योजना लघु बचत योजनेअंतर्गत चालवली जाते.
राष्ट्रीय पेन्शन योजना
या योजनेत तुम्ही नियमित गुंतवणूक करू शकता. रिटायरमेंटनंतर, कर्मचारी या योजनेतून काही पैसे काढू शकतो आणि उर्वरित पैसे कॉर्पस खरेदीमध्ये गुंतवू शकतो, त्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन दिली जाईल. ही मार्केट लिंक्ड योजना आहे आणि 8 ते 10 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळतो. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही त्यातून पैसेही काढू शकता.
प्रधानमंत्री वय वंदना योजना
या योजनेअंतर्गत पेन्शनसोबतच विम्याचाही लाभ मिळतो. ज्येष्ठ नागरिक LIC अंतर्गत, ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये 10 वर्षांसाठी 7.4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते.
अटल पेन्शन योजना
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू केलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) नागरिकांना निवृत्तीनंतर किंवा ते त्यानंतरही काम करत असतील तर त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात ठराविक रक्कम मिळवून देते. पेन्शन मिळण्यासाठी अपेक्षित असलेली किमान रक्कम जर एखाद्या व्यक्तीची जमा झाली नसेल तर सरकार ती कमतरता भरून काढून त्या व्यक्तीला पेन्शन मिळेल यादृष्टिने प्रयत्न करते. या योजनेअंतर्गत मासिक 1 हजार, 2 हजार, 3 हजार आणि 5000 रुपये पेन्शन घेता येते.