2023 च्या सुरुवातीस हजारो कर्मचार्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. टेक कंपन्यांमधील मोठ्या प्रमाणात टाळेबंदीने हे सिद्ध केले की Google , Microsoft आणि Amazon सारख्या मोठ्या दिग्गज कंपन्या देखील आर्थिक मंदीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांपासून स्वतःची सुटका करू शकत नाहीत. कंपन्या अतिरिक्त खर्च वाचवण्यासाठी आणि महसुली नफा स्थिर किंवा घटत असताना खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कठोर पावले उचलत आहेत.
PayPal मधून होणार 2000 कर्मचारी कपात (2000 Layoffs from PayPal)
फिनटेक फर्म पेपल होल्डिंग्जने मंगळवारी जाहीर केले की ते सध्याच्या आर्थिक आव्हानांमुळे कर्मचार्यांना काढून टाकणार आहे आणि कंपनीतील कर्मचार्यांपैकी ही 7 टक्के कपात असेल. बिग टेक कंपन्या सध्या कर्मचारी कपातीच्या धोरणाचा अवलंब करत आहेत. यामुळे थेट कंपनीच्या खर्चावर सकारात्मक परिणाम होत आहे. PayPal चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन शुलमन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही कंपनीच्या खर्चाचे योग्य नियोजन करून हा निर्णय घेतला आहे”
लवकरच कर्मचारी कपातीचे संकेत (Signs of layoffs soon)
आगामी आठवड्यात ही कर्मचारी कपात होईल आणि प्रभावित कर्मचार्यांना त्यांच्या टीम लीडरद्वारे या निर्णयाबद्दल माहिती दिली जाईल. कुठल्याही विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीला यावेळी कंपनी संरक्षण देणार नाही. कंपनीचा हा निर्णय बहूआयामी असेल.
विशेष म्हणजे, कंपनीतील अनेक अधिकारी म्हणतात की आव्हानात्मक काळ आणि मंदावलेला ई-कॉमर्स ट्रेंड यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीनंतर कंपनीच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. यानंतर कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे.