• 07 Dec, 2022 09:18

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google Layoff, Google, Job cut, recession

Image Source : www.twitter.com

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Google decide to cut 10000 jobs : जगभरातील मोठमोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये लेऑफ चा सीझन सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळाले आहे.   ट्विटर, अमेजॉन, मेटा यासारख्या कंपन्या कर्मचारी कपातीसंबंधी निर्णय घेत असतानाच आता गुगलही 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते, असा अहवाल मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी पुढे आला आहे. प्रतिकूल व्यावसायिक परिस्थिती आणि खर्चात कपात करण्यासाठी अ‍ॅक्टिव्हिस्ट हेज फंडांनी कर्मचारी कपातीविषयी गूगलवर दबाव आणला आहे. या निर्णयामुळे गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या 10 हजार कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले जाऊ शकते..

हेज फंड टीसीआयकडून अल्फाबेटला याविषयी पत्र लिहिले होते. या पत्रात टीसीआयचे एमडी क्रिस्टोफर होन यांनी अल्फाबेटच्या होणाऱ्या खर्चाविषयी भाष्य  करून कंपनीने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. कंपनीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तसेच प्रती कर्मचारी खर्चही खूप जास्त असल्याचे ते म्हणाले होते. यानंतर काही दिवसातच याविषयी बातमी आली आहे. TCI चे Alphabet मध्ये $6 अब्ज किमतीचे शेअर्स आहेत.

रेटिंग कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात

Alphabet  ने वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांच्या  कामगिरी सुधारण्याविषयीची कंपनीची भूमिका जाहीर केली होती. या सर्व  प्रक्रियेचा हा भाग आहे. यामुले गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आता मोठ्या प्रमाणात ले ऑफच्या प्रक्रियेत असणाऱ्या बिग टेक कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होऊ शकते.लेऑफचा निर्णय घेताना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे. वार्षिक मूल्यमापनात कमी रेटिंग असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

मंदीमुळे नोकर कपातीचा ट्रेंड  (layoff season)

बहुतांश IT कंपन्या कर्मचारी कपात करुन आपला खर्च कमी करत आहेत. मेटाने गेल्या आठवड्यात हेडकाउंट 13 टक्क्यांनी कमी केले. Amazon  आपले हेडकाउंट 10,000 ने कमी करत आहे. मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, स्ट्राइप आणि ट्विटर देखील प्रचंड प्रमाणत मनुष्यबळ कमी करणार आहेत. या बड्या कंपन्यांनी सर्वच विभागात नोकर कपातीचे धोरण अवलंबले आहे. याला कारण म्हणजे अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदी आहे. मंदीमुळे या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.