तुम्हाला देखील घरबसल्या मोठी रक्कम (Earn money) कमवायची असेल तर तुमच्याकडे ही एक चांगली संधी चालून आली आहे . Mygov India या वेबसाईटनुसार , तुम्हाला मेगा फूड इव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर 50,000 रुपये मिळू शकतात . परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावे लागणार आहे . मोदी सरकारच्या या मेगा फूड इव्हेंटसाठी तुम्हाला एक क्रिएटिव्ह टॅगलाईन लिहून द्यावी लागणार आहे . भारत सरकारने 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष ' (International Year of Millets) म्हणून घोषित केले आहे . याच पार्श्वभूमीवर खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाने मेगा फूड इव्हेंट 2023 रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे . हा कार्यक्रम अधिक यशस्वी करण्यासाठी सरकारने टॅगलाईन स्पर्धा सुरू केली आहे . या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावे लागेल चला जाणून घेऊयात .
स्पर्धेमध्ये कसेसहभागीव्हाल ?
- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी , तुम्हाला Mygov.India या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी तुमची टॅगलाईन सबमिट करावी लागेल
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे
Mygov India वेबसाईटवर तुमचीप्रोफाईलतयारकरा
- क्रिएटिव्ह टॅगलाईन सबमिट करण्यासाठी तुम्ही प्रथम Mygov India वर तुमचे प्रोफाइल तयार केले पाहिजे
- यामध्ये नाव , फोटो , पत्रव्यवहाराचा पत्ता , ईमेल -आयडी आणि मोबाईल नंबर यांसारखे तपशील भरावे लागतील
- जी प्रोफाईल अपूर्ण असेल त्यांची प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही
- याशिवाय एका प्रोफाईलमधून अनेक नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत
निवड प्रक्रियाकशी असेल ?
- छाननी आणि पुरस्कार प्राप्त झालेल्या लोकांची नावे निश्चित करण्यासाठी खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाने एक निवड समिती स्थापन केली आहे
- निवड समितीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणतेही कारण न देता कोणाचाही प्रवेश नाकारण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे
- स्पर्धेच्या विजेत्याला याची माहिती ईमेलद्वारे (E-mail) दिली जाईल
- आतापर्यंत या कामांतर्गत 876 नोंदी शासनाला प्राप्त झाल्या असून या 876 नोंदींचाआढावा घेण्यात येत आहे . मात्र , अद्याप एकही प्रवेश मंजूर झालेला नाही