Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NPS Account Open Online: 'Driving License' च्या माध्यमातून उघडा NPS अकाउंट

NPS Account Open Online

NPS Account Open Online: पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) डिजीलॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा(DL) वापर करून NPS खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

NPS Account Open Online: जर तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये तुमचे खाते उघडायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरणने (PFRDA) डिजीलॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा (DL)वापर करून नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) योजना काय आहे?

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) हा सेवानिवृत्तीनंतरच्या नियोजनाच्या दृष्टीने चांगला गुंतवणूक पर्याय आहे. NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. NPS मधील गुंतवणुकीमध्ये निवृत्तीनंतर एक रकमी मोठा सेवानिवृत्ती निधी मिळतो. याशिवाय तुम्हाला तुमची वार्षिक रक्कम आणि त्याच्या कामगिरीच्या आधारावर मासिक पेन्शन देखील मिळते. आता NPS ग्राहक डिजी लॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा(DL) वापरू करून घरचा पत्ता देखील अपडेट करू शकतात.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने 'NPS' खाते कसे उघडायचे?

  1. Protean CRA वेबसाईट enps.nsdl.com वर NPS नोंदणी पृष्ठावर जा
  2. आता DigiLocker अंतर्गत कागदपत्रांसह नवीन नोंदणीचा ​​पर्याय निवडा आणि ड्रायव्हिंग लायसन्स(DL) पर्यायांची निवड करा
  3. अर्जदाराला डिजीलॉकर वेबसाईटवर पुन्हा निर्देशित केले जाईल, जिथे तो/ती लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करू शकतो. यासाठी तुम्हाला संमती द्यावी लागेल
  4. आता NPS ला डिजिलॉकरने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्यावी लागेल 
  5. ड्रायव्हिंग लायसन्सनुसार आवश्यक ती संपूर्ण माहिती भरा
  6. अर्ज भरण्यासाठी पॅन, वैयक्तिक तपशील, बँक खात्याशी संबंधित माहिती आणि इतर तपशील द्यावे लागतील
  7. या प्रक्रियेनंतर तुमचे खाते उघडले जाईल आणि तुम्ही NPS मध्ये पैसे जमा करु  शकता