राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS - National Pension Scheme) खात्यात दरवर्षी किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही वर्षात निर्धारित रक्कम जमा केली नसेल, तर तुमचे NPS खाते 'फ्रीज' किंवा 'निष्क्रिय' होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला खाते चालवताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पण जास्त काळजी करण्याची गरज नाही. योग्य प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही तुमचे खाते सहजपणे पुन्हा सक्रिय करू शकता.
Table of contents [Show]
एनपीएस खात्यात मिनीमम जमा करण्याचे नियम
एनपीएस (NPS) खाती दोन प्रकारची असतात. टायर 1 (Tier I) आणि टायर 2 (Tier II). NPS चे सदस्य होण्यासाठी टायर 1 खाते उघडणे आवश्यक आहे. यानंतर, सदस्याची इच्छा असल्यास, तो टायर 2 खाते देखील उघडू शकतो. टायर 1 खात्यात वर्षभरात किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे. एका वेळी किमान 500 रुपये जमा करता येतील. त्याच वेळी, टायर 2 खाते उघडताना, किमान 1000 रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर किमान 250 रुपये एकावेळी जमा करावे लागतील. परंतु वार्षिक योगदानासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही.
एनपीएस खाते पुन्हा कसे सुरू करावे?
किमान रक्कम जमा न केल्यामुळे गोठवलेले (फ्रीझ झालेले) एनपीएस (NPS) खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, ग्राहकाला (सब्सक्राइबरला) वार्षिक योगदानाच्या पूर्ण रकमेव्यतिरिक्त 100 रुपये दंड भरावा लागतो. ही प्रक्रिया ऑफलाइन पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP – Point of Presence) वर जाऊन एक फॉर्म भरावा लागेल आणि योगदान (contribution) आणि दंडाची रक्कम जमा करावी लागेल. येथे POP म्हणजे सेवा प्रदाता ज्याद्वारे तुम्ही तुमचे एनपीएस (NPS) खाते उघडले आहे किंवा जेथे तुम्ही तुमचे पैसे तुमच्या एनपीएस (NPS) खात्यात जमा केले आहेत.
खाते पुन्हा सक्रिय (Active) करण्याचा ऑनलाइन मार्ग
जर तुम्ही तुमचे एनपीएस (NPS) खाते ऑनलाइन उघडले असेल आणि ते त्याच प्रकारे ऑपरेट करत असाल, तर तुम्ही गोठवलेले खाते (Freez account) पुन्हा सुरू करण्याचे काम देखील करू शकता. यासाठी तुम्हाला eNPS पोर्टलवर जावे लागेल. मुख्यपृष्ठावर जा आणि योगदान (Contribution) पृष्ठावर क्लिक करा. यानंतर, उघडलेल्या पृष्ठावर, तुम्ही तुमचा परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) आणि जन्मतारीख देऊन तुमचे थकित योगदान आणि दंड जमा करू शकता.
किती दंड भरावा लागेल?
गोठवलेले खाते (Freez Account) पुन्हा सुरू करण्यासाठी 100 रुपये दंड भरावा लागेल. परंतु स्वावलंबन योजनेंतर्गत सदस्यत्व घेतलेल्या खातेदारांना केवळ 25 रुपये दंड भरावा लागेल. खाते पुन्हा उघडताना, 100 रुपयांच्या दंडासह चालू वर्षासाठी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. हे पैसे जमा करण्याचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या योगदानाची (Contribution) उर्वरित रक्कम देखील जमा करू शकता. एनपीएस (NPS) ही एक अशी सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही नियमित गुंतवणूक करून निवृत्तीवेतनासह चांगल्या कॉर्पस फंडाची व्यवस्था करू शकता.