Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Jobs: आता 37 व्या वर्षीही बीएसएफसीच्या नोकरीसाठी तुम्ही करू शकता अर्ज

BSFC Jobs

Bihar BSFC Recruitment 2022 Apply Link: बिहार राज्य अन्न आणि नागरी पुरवठा निगम लिमिटेड मध्ये विविध क्षेत्रात 526 पदे भरण्यात येणार आहे. उमेदवार यासाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.

Bihar Recruitment 2022: बिहार संयुक्त प्रवेश स्पर्धा परीक्षा मंडळाने बिहार राज्य अन्न व नागरी पुरवठा निगम लिमिटेडमध्ये (BSFC)विविध पदांची भरती केली जाणार आहे. बिहार बीएसएफसी भरती 2022 बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

किती आणि कोणत्या पदासाठी भरती असेल?

सहाय्यक व्यवस्थापक(Assistant Manager), सहाय्यक लेखाधिकारी(Assistant account officer), लेखापाल(Accountant), गुणवत्ता नियंत्रक(Quality Controller) आणि लोअर डिव्हिजन क्लर्क(LDC) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापकासाठी 262 पदे, सहाय्यक लेखाधिकारी पदासाठी 20 जागा, लेखापाल पदासाठी 10 जागा, गुणवत्ता नियंत्रकाची 133 पदे आणि लोअर डिव्हिजन क्लर्क करिता 101 पदे भरण्यात येणार आहेत. बिहार बीएसएफसीच्या bceceboard.bihar.gov.in या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भातील नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता. या भरती प्रक्रियेत एकूण 526 पदे भरण्यात येणार आहेत.

उमेदवाराची वयोमर्यादा काय असेल?

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा ३७ वर्षे ठेवण्यात आली आहे. जर तुम्ही देखील वयाची ३० पूर्ण केली आहे तर वाईट वाटून घेण्याची गरज नाही. या सरकारी नोकरीसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. 

अर्ज कुठे आणि कधीपर्यंत करायचा?

bceceboard.bihar.gov.in या लिंकच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार 13 डिसेंबर 2022 पासून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरण्याऐवजी तुम्ही अंतिम तारखे अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.