एक उद्योजक म्हणून उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि नियुक्त करणे हे माझे प्राधान्य आहे, असे मगाली यांनी म्हटले आहे. एका लेखात त्यांनी कामाच्या वातावरणाच्या बाबतीत त्यांच्या कंपनीच्या वातावरणाची प्रशंसाही केली आहे.
जागतिक बाजारात मंदीच्या भीतीने व्यापारी धास्तावले आहेत. मोठ्या कंपन्या Layoff मार्गावर आहेत. कंपन्यांमधील राजीनाम्यांच्या बातम्या आता किरकोळ झाल्या आहेत. मात्र, नोकऱ्यांवरील संकटाच्या या काळातही एक कंपनी लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एआय डिजिटल (AI Digital ) या न्यूयॉर्कस्थित जाहिरात कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफेल मगाली यांनी दावा केला आहे की गेल्या पाच वर्षांत त्यांच्या संस्थेतील एकाही कर्मचाऱ्याने राजीनामा दिलेला नाही.
कठीण काळात एकमेकांना साथ देऊन मार्ग काढला
मॅगली यांनी त्यांच्या कंपनीच्या कामाच्या वातावरणाची प्रशंसा केली आणि एका लेखात म्हटले आहे की, उद्योजक म्हणून त्यांच्यासाठी उच्च प्रतिभांना आकर्षित करणे आणि त्यांची नियुक्ती करणे ही त्यांची प्राथमिकता आहे. त्यांनी लिहिले आहे की, कोरोना महामारीच्या काळात आम्ही सर्व तणावाखाली होतो, आम्ही सर्वजण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो पण आम्ही एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांना आधार दिला. आम्ही कठीण काळात एकमेकांना साथ दिली आणि त्यातून मार्ग काढला. मगाली यांनी लिहिले की, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लवचिकता देणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या टीमला मोकळेपणाने काम करू दिले. मॅगली यांच्या मते, व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संपर्कात राहिले पाहिजे.
layoff चा हंगाम
मोठमोठ्या कंपन्यातून होणारी कर्मचारी कपात आता सामान्य बनली आहे. अनेक मोठ मोठ्या कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहेत. यासाठी आर्थिक कारण दिल जात आहे. अशा स्थितीत सीईओंचा हा दावा लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.