Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Re-KYC साठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, ईमेल-मोबाईवरून देऊ शकता बँकेला माहिती

Re-KYC

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.

Re-KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही. मोबाईल क्रमांक किवा ईमेलवरुन बँकेला याची माहिती दिली जाऊ शकते. शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.  
KYC संदर्भातली ही महत्वाची घडामोड आहे. कारण आरबीआय गव्हर्नर यांनीच यासंदर्भात हे भाष्य केले आहे. यामुळे ई केवायसीसाठी ग्राहकांना वारंवार बँकेत जण्याची गरज लागणार नाही. दुसऱ्यांदा केवायसी करताना ही सूट मिळू शकते.  समजा एखाद्या ग्राहकाचा पत्ता बदलला तर त्यासाठी त्या व्यक्तीला पुन्हा बँकेत जाण्याची गरज नाही. 

फक्त CKYCR Identify क्रमांक बँकेसोबत शेअर करावा लागेल. यापूर्वीच तुम्ही बँकेत KYC ची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर हीच प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेत न जाता घरातूनच ऑनलाइन पद्धतीने री केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. केवायसी तपशीलात काहीच बदल करण्यात आला नसेल तर बँकेत जाण्याची गरज नाही.  

लोकपालाकडे दाद मागता येते 

ई-मेल किवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन बँकेला मेसेज केल्यावर बँक पुढच्या 60 दिवसात सत्यापन करून प्रक्रिया पूर्ण करेल. CKYCR Identify क्रमांकावरुन ही प्रक्रिया करता येईल. अस असतानाही बँक केवायसीसाठी ब्रॅंचमध्ये येण्यासाठी आग्रही असेल तर लोकपालकडे दाद मागता येते.

KYC म्हणजे काय? 

KYC म्हणजे Know Your Customer. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँक किवा वित्तीय क्षेत्रातील कोणतीही कंपनी आवश्यक कागदपत्रासह फॉर्म भरून घेऊन ग्राहकांची ओळख आणि पत्ता ग्राहकांकडून प्राप्त करते.  
केवायसी ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँक किंवा कोणतीही वित्तीय क्षेत्रातील कंपनी आवश्यक केवायसी कागदपत्रांद्वारे फॉर्म भरून आपल्या ग्राहकांकडून ग्राहकांची ओळख आणि पत्ता प्राप्त करते. बँकेला दिलेल्या माहितीत काही बदल झाल्यास ते अपडेट करणे आवश्यक असते.