मागची दोन वर्षं कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे (Coronavirus Outbreak) लॉकडाऊनमध्ये गेली. त्यामुळे यंदाच्या न्यू ईयरसाठी (New Year Travel) प्रवास करण्यासाठी भारतीयांमध्ये उत्साह वाढलाय. अशावेळी त्यांची पसंती कुठल्या ठिकाणाला आहे याचा एक सर्च डेटा (Search Data) बुकिंग डॉट कॉम या कंपनीने अलीकडे प्रसिद्ध केला आहे. यात लोकांनी गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर सर्च केलेला आणि तिकीटं बुकिंग करणाऱ्या पोर्टलवरचा डेटा वापरण्यात आला आहे.
हा डेटा बघितला तर भारतीयांची पसंती समुद्र किनारे, निसर्गरम्य ठिकाण (पर्वतरांगा) आणि रोड ट्रिप्स यांना आहे. न्यू ईयरचा हंगाम हा नाताळच्या सुटीपासूनच सुरू होतं. त्यामुळे 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंतचा डेटा यासाठी गृहित धरण्यात आला आहे.
बुकिंग डॉट कॉमच्या (Booking.com) म्हणण्यानुसार, देशांतर्गत ठिकाणांमध्ये पुद्दुचेरी (Puducherry) सगळ्यात आघाडीवर आहे. त्या खालोखाल लोणावळा (Lonavala), मनाली (Manali), मुन्नार (Munnar) आणि सिमला (Simla) या शहरांचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय ठिकाणांमध्ये सगळ्यात वरचा क्रमांक दुबईचा लागतो.
समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणांची भारतीयांना भुरळ Indians Choose Beaches & Historical Places
एरवी न्यू ईयरसाठी भारतीयांचं सगळ्यात लोकप्रिय ठिकाण आहे गोवा, अर्थात तिथल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे. यंदा पुद्दुचेरीने गोव्याला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं आहे. त्याखालोखाल ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी भारतीय उत्सुक आहेत. उदयपूर आणि जयपूरकडेही पर्यटकांचा ओढा आहे. थंड हवेच्या ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्यांची पसंती सिमला आणि मुन्नारला आहे.
इंटरनेटचा डेटाही फारसा वेगळा नाहीए. 24 डिसेंबर ते 2 जानेवारी (Check-In dates) दरम्यान सहल करू इच्छिणाऱ्या लोकांनी पुद्दुचेरी, लोणावळा, मनाली या ठिकाणांसाठी माहितीच गोळा केली आहे. तसंच हॉटेल बुकिंगसाठीही (Hotel Booking) हीच ठिकाणं तपासली जातायत. याखेरीज उदयपूर, मुंबई, जयपूर, गोवा, बेंगळुरू, मुन्नार आणि सिमला या ठिकाणांची माहितीही इंटरनेटवरून मोठ्या प्रमाणावर पाहिली गेली आहे.
न्यू ईयर दरम्यान आंतरराष्ट्रीय प्रवास वाढणार International Travel on Rise
परदेश प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्याही दिवसें दिवस वाढतेय . आणि न्यू ईयरसाठीही अनेकांनी परदेशातल्या ठिकाणांना पसंती दिली आहे. त्यासाठी भारतीयांनी यंदा निवड केलीय ती दुबईची. त्या खालोखाल बँकॉक आणि सिंगापूरला जाण्याचे प्लान भारतीयांनी बनवले आहेत. ज्यांची यापेक्षा जास्त पैसे खर्च करण्याची तयारी आहे अशा लोकांनी थेट लंडन, पॅरिस, पेटाँग बिच, नॉर्थ माले, कोलंबो, फुकेत आणि उबुड यांची निवड केली आहे.
जगभरातला आढावा घेतला तर न्यू ईयरच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरिस या शहराची निवड जगभरातल्या सर्वाधिक लोकांनी केली आहे. जगातल्या टॉप 15 न्यू ईयर डेस्टिनेशनमध्ये (New Year Destination) पॅरिस पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल दुबई, लंडन, अॅमस्टरडॅम, रोम, टोकयो, बार्सिलोना, प्राग, विन तसंच न्यूयॉर्कला पसंती आहे.