IRCTC New Year Trip: डिसेंबर ( December) महिना सुरू होताच प्रत्येकजण नवीन वर्षाचे प्लॅन्स ( New Year Plans) बनवू लागतो. वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर संपायला अवघे काही दिवसच बाकी आहेत , अशातच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा काय प्लॅन ? ही एकच चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र ही चर्चा आणि ठरलेले गोव्याचे प्लॅन बजेट अभावी रद्द होतात पण आता तुम्हाला निराश व्हायची गरज नाही कारण हे नवीन वर्ष तुम्ही IRCTC New Year Trip पॅकेज सोबत गोव्यात साजरे करू शकता आणि ते ही तुमच्या बजेटमध्ये! या पॅकेजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही EMI द्वारेही या टूरचे हफ्ते सहज भरू शकता.
IRCTC New Year Trip पॅकेजमध्ये कोणत्या सुविधांचा समावेश असेल ?
- या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना विमानाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे
- हे बजेट फ्रेंडली टूर पॅकेज लखनऊ पासून सुरु होईल
- IRCTC च्या इतर टूर पॅकेजप्रमाणे राहण्याची आणि जेवणाची सुविधाही मोफत दिली जाईल
- थ्री स्टार ( 3 star) हॉटेलमध्ये पर्यटकांची राहण्याची सर्वोत्तम सोय करण्यात येईल
- नाश्ता आणि जेवणही उपलब्ध करून दिले जाईल.
गोव्यातील ' या ' ठिकाणांना पर्यटक देतील भेट
- बेसिलिका ऑफ बोन जीसस चर्च
- मिरामार बीच
- संध्याकाळी मांडोवी नदी क्रूझ
- उत्तर गोव्यातील बागा बीच
- कँडोलिम बीच
- सिंक्वेरिम बीच आणि स्नो पार्कला भेट
IRCTC New Year Trip पॅकेजची रक्कम किती असेल ?
- IRCTC च्या 3 रात्र 4 दिवसांच्या टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसोबत प्रवास करताना एका व्यक्तीला 28,040 रुपये मोजावे लागतील
- दोन व्यक्तींसोबत राहण्यासाठी एका व्यक्तीला 28,510 रुपये मोजावे लागतील
- एका व्यक्तीला एकट्याला गोव्याला जाण्यासाठी 34,380 रुपये मोजावे लागतील
- या पॅकेजची चांगली गोष्ट म्हणजे या ट्रिपचे पेमेंट EMI द्वारे देखील केले जाऊ शकते
- या टूर पॅकेजबद्दल उर्वरित माहितीसाठी , तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाईट www.irctctourism.com ला भेट देऊन जाणून घेऊ शकता.