Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

AMFI : म्युच्युअल फंडमध्ये 5.88 टक्के वाढ, पण वाढीची गती मंदावली

Mutual Fund

Mutual Funds :म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

2022 या वर्षाअखेर 40 लाख कोटींच्या जवळपास ही रक्कम पोहोचली होती. म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे.  अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

Mutual Fund हा गुंतवणूकीचा पर्याय सर्वांच्या परिचयाचा झाला आहे.   हा पर्याय दिवसेंदिवस लोकप्रिय होताना देखील दिसत आहे.   SIP मुळे याची लोकप्रियता वाढत चालली आहे. यामुळे 2022 या वर्षी म्युच्युअल फंडातील मालमत्तेत  2.2 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेस (एयूएम) सरलेल्या वर्षांत ही एकूण 5.7  टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022 वर्ष संपताना  एकूण 39 लाख 88 हजार  कोटी रुपयांवर पोहोचली, अशी माहिती म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने मंगळवारी दिली आहे. मात्र त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच 2021 मध्ये भांडवली बाजारात तेजी होती. या तेजीचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही उमटल्याचे दिसून आले.  त्या वर्षांत 7 लाख कोटी इतकी भर पडलेली बघायला मिळाली होती. त्या तुलनेत सरलेल्या वर्षांतील वाढ फारशी मोठी  नाही असे दिसते. वर्ष 2021 मध्ये फंड मालमत्तेमध्ये  वार्षिक 22 टक्क्यांची वाढ होऊन, ती 37.72 लाख कोटींवर पोहोचली, अशी नोंद करण्यात आली होती. भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि बदलत्या व्याजदर परिस्थितीमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे 2022 मध्ये आढळून आले. यामुळे गेल्यावर्षी  उद्योगाची वाढ संथ गतीने झाली. प्रतिकूल बाजार स्थितीमुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना समभागसंलग्न म्युच्युअल फंड, रोखे आणि हायब्रिड फंडामधील गुंतवणुकीचा आढावा घेऊन फेर-गुंतवणूक करावी लागली  होती. त्याउलट 2021 मधील भांडवली बाजारातील तेजी म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीस कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. 

SIP द्वारे 13 हजार कोटींची गुंतवणूक  

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये  नोव्हेंबरमध्ये नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या SIP च्या माध्यमातून विक्रमी म्हणता येईल अशा 13 हजार कोटींची मासिक गुंतवणूक आल्याचे दिसून आले. किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडाबाबत जागरूकता वाढत आहे. ही जागरूकता निर्माण करण्यात ‘अ‍ॅम्फी’ने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे दिसून येते.  सरलेल्या वर्षांत, ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी दरमहा गुंतवणूक सरासरी 12 हजार 500  कोटींहून अधिक राहिल्याची नोंद आहे.

Mutual Fund मध्ये एकूण निव्वळ प्रवाह 2022 मध्ये, 71 हजार 443 कोटी रुपये इतका  होता. समभागसंलग्न योजनांमध्ये सर्वाधिक 1.61 लाख कोटी रुपये, इंडेक्स फंड आणि ईटीएफमध्ये 1.65 लाख कोटी रुपये इतके जमा झाले.  रोखे योजनांमधून 2.5  लाख कोटींचा निधी काढून घेण्यात आला. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढली. ही संख्या  14.11 कोटींवर पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

समभाग आणि समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांविषयी वाढती जागरूकता आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्माणाची त्यांची क्षमता यामुळेच 2022 मध्ये या योजनांमधील प्रवाहात  वाढ झाली. हा सातत्यपूर्ण प्रवाह किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या जागरूकतेचे प्रतीक मानला जात आहे. 2022 हे वर्ष  अस्थिर राहिल्याने बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कायम ठेवल्याचेही  निदर्शनास आले आहे.