Vande Bharat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) फेब्रुवारीत मुंबई दौर्यावर येणार आहेत. यावेळच्या दौऱ्यात ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर या धर्मिक स्थळांना जोडणार्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 10 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता मोदींनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी(CSMT) येथून शिर्डीसाठी तसेच सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. या ट्रेनच्या तिकिटाचे दर काय असतील? आणि स्थानके कोठे असतील हे जाणून घ्या.
Table of contents [Show]
मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक काय असेल?
मुंबई ते शिर्डी(Mumbai to Shirdi) वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे सीएसएमटीवरून सकाळी 6.15 वाजता सुटेल, जी शिर्डीत दुपारी 12.10 वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास संध्याकाळी 5.25 वाजता सुरू होईल, जो मुंबईत रात्री 11.18 वाजता संपेल. या नव्या ट्रेनने 5. 55 तासात प्रवास पूर्ण करता येणार आहे. मंगळवार वगळता आठवड्याचे बाकीचे दिवस ही ट्रेन धावणार आहे.
सोलापूर ते मुंबईची स्थानके जाणून घ्या
सोलापूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने 455 किमी इतके असून या गाडीने हा प्रवास केवळ साडे सहा तासात हा प्रवास पूर्ण करण्याची शक्यता आहे. याअगोदर एक्सप्रेस गाडीला हा प्रवासा करण्यासाठी साधारण साडे आठ तास लागत होते .
स्थानके: सोलापूर, (Solapur) कुर्डूवाडी, (Kurduwadi Junction) पुणे, (Pune) लोणावळा, (Lonavala) ठाणे, (Thane) दादर, (Dadar) या ठिकाणी गाडी थांबणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
तिकिटाची किंमत काय असेल?
या गाडीतील चेअर कारसाठी 900 ते 1100 रुपये तिकीट असणार आहे. याशिवाय एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900 ते 2200 रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, पाणी बॉटल देखील मिळेल असे बोलले जात आहे.
साईनगर शिर्डी ते मुंबईची स्थानके जाणून घ्या
साईनगर शिर्डी ते मुंबई हे अंतर 385 किमी इतके असून एक्सप्रेस गाडीला हा प्रवास करण्यासाठी साधारण 6 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे पाच तासात हे अंतर पूर्ण करणार आहे.
स्थानके: साईनगर शिर्डी(Shirdi), नाशिक(Nashik), ठाणे(Thane), दादर(Dadar), मुंबई(Mumbai) हे या ठिकाणी गाडी थांबणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
तिकिटाची किंमत काय असेल?
या गाडीतील चेअर कारसाठी 800 ते 1000 रुपये आकारले जातील, तर एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर असण्याची शक्यता आहे.