PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून आज (गुरुवार) शहरात तब्बल 38 हजार कोटी रुपयांच्या लोकोपयोगी विकासकामांचे भूमिपूजन केले. "शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी भांडुप येथील 360 खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, गोरेगाव येथे 306 खाटांचे रुग्णालय तसेच ओशिवरा येथील 152 खाटांच्या प्रसूतीगृहाच्या पुनर्विकासाचा शुभारंभ देखील पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते पार पडला. यासोबत इतरही अनेक विकासकामांचे उद्घाटन त्यांनी केले.
मुंबईतील मेट्रोचे उद्घाटन - (PM Narendra Modi inaugurated Mumbai Metro)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत मेट्रो 2 अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी मेट्रोतून प्रवासही केला.मुंबई महानगरपालिका हद्दीतील २० नवीन दवाखान्यांचे लोकार्पण देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मुंबईतील सव्वा लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.
मुंबईच्या विकासासाठी बजेटची अजिबात कमतरता नाही. पण लोकांच्या हक्क्याच्या पैशाचा सुयोग्य विनियोग व्हायला हवा. भ्रष्टाचार होणार असेल तर शहराचा विकास होऊ शकत नाही. पीएम स्वनिधी योजना फक्त लोन देणारी योजना नाहीय. फेरीवाले आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी आर्थिक बळ देणारी स्वाभिमान प्राप्त करून देणारी योजना आहे. स्वनिधी योजना स्वाभिमानाची जडीबुटी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वनिधी योजनेअंतर्गत डिजिटल व्यवहार फेरीवाले, ठेलेवाल्यांना कळावेत यासाठी मुंबईत सव्वा तीनशे कॅम्प लावण्यात आले होते. यामुळे हजारो फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहाराचं ज्ञान प्राप्त झालं. आज जवळपास ५० हजार कोटी रुपायांचं डिजिटल ट्रान्झाक्शन ज्यांना आपण अशिक्षित मानतो, कमी लेखतो अशा लोकांनी हा पराक्रम केला आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री धारावीचा पुनर्विकास करण्यास सरकार कटिब्ध आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. तर वॉटर ट्रिटमेंट प्लाँटद्वारे नद्या स्वच्छ करण्यात येत आहेत, असे मोदी म्हणाले.