Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Integrated Transport : मुंबईत आता बघायला मिळणार डबलडेकर बोगदे! 

Multideck Tunnel

Image Source : www.globaltimes.cn

Mumbai Integrated Transport : एकात्मिक वाहतूक प्रणालीच्या निमित्ताने आता मुंबईत जागतिक दर्जाचे डबलडेकर बोगदेही पाहायला मिळणार आहेत. वाहतूक कोंडीवरचा एक उपाय म्हणून त्याकडे बघितलं जातंय. आणि असे बोगदे कुठे उभारता येतील हे ठरवण्यासाठी तीन सदस्यीय समितीही नेमण्यात आलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुंबईतल्या वाहतुकीवर एक तोडगा काढलाय. एकात्मिक वाहतूक विकास (Integrated Transport System) अंतर्गत राज्यसरकारने प्रस्ताव ठेवलाय तो मुंबईत मोक्याच्या जागी डबलडेकर बोगदे (Multideck Tunnels) उभारण्याचा. MMRDA क्षेत्राला इतर सार्वजनिक वाहतूक यंत्रणेशी जोडण्याचं काम हे बोगदे करतील. त्यामुळे भविष्यात इतर जागतिक शहरांप्रमाणेच मुंबईतही आपल्याला खालून मेट्रो गाडी जातेय. आणि त्यावरून बस किंवा इतर वाहनं असं चित्र दिसू शकेल.    

या पर्यायाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणालीचा अभ्यास असलेले तज्ज्ञ अशी तीन जणांची तज्ज्ञ समिती त्यासाठी नेमली आहे. ही समिती या शक्यतेचा विचार करण्याबरोबरच मुंबईत कुठे कुठे असे डबलडेकर बोगदे शक्य आहेत याचा अहवालही सादर करणार आहे.    

जागतिक पातळीवर अशा बोगद्यांना मल्टीडेक टनेल (Multideck Tunnel) असं म्हणतात. आणि खासकरून अमेरिकेतलं टेक्सास शहर अशा बोगद्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर तिथे उड्डाणपूलही तिहेरी किंवा काही ठिकाणी चार पूल एकमेकांवरून जातात. अशा प्रकारचं एखादं मॉडेल डोळ्यासमोर ठेवून मुंबईत एकात्मिक वाहतूक विकार साध्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत तज्ज्ञांना दिल्या आहेत.    

मुंबईतली वाहतूक कोंडी लवकरात लवकर फोडण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर सरकार चर्चा करत आहे.