Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Metro, Rail, Mono & BEST Travel will be Done on a Single Ticket: आता, एकाच तिकीटावर होणार मेट्रो, रेल्वे, मोनोने प्रवास

Mumbai Transportation Latest News

Image Source : http://www.en.wikipedia.org.com/

Mumbai Transportation Latest News: मुंबईच्या धावपळीच्या दुनियेत प्रवाशांना दिलासा देणारी बातमी येत आहे. आता रेल्वे, मेट्रो, बेस्ट व मोनोचा प्रवास एकाच तिकीटावर होणार आहे. यासाठी एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Mumbai Transportation Latest News: मुंबईकर म्हणाले की, प्रवासाचे चित्र समोर येते. त्यात मेट्रो, बस, रेल्वे व मोनोसाठी लागणाऱ्या तिकिटाच्या रांगा हे तर समीकरणच बनले आहे. त्यात तिकिटासाठी पायपीट करताना, मुंबईकरांची कधी कधी ट्रेन चुकत असत. म्हणूनच त्यांचा हाच प्रवास सुखकर होण्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. आता मुंबईकरांसाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे, मेट्रो, मोनो व बेस्टसाठी एकच तिकीट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.

कधी होणार सुरूवात (When will it Start)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणाली सुविधेची सुरूवात 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या सुविधेव्दारे लवकरच मुंबईकरांना मोनो, रेल्वे, मेट्रो व बेस्टसाठी एकाच तिकीटाने प्रवास करणे शक्य होणार आहे. ही सुविधा सध्या मेट्रो 2 अ (दहीसर ते डीएन नगर) व मेट्रो 7 (दहीसर ते गुंदवली) मार्गासाठी लागू होणार आहे.

एक कार्ड, एक तिकीट (A Card or Ticket)

मुंबईकरांचा बेस्ट, मेट्रो, ट्रेन व मोनोसाठीचा प्रवास हा एकाच तिकिटावर होणार आहे. यासाठी काही तांत्रिक चाचण्यादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. याचा मुळ हेतू म्हणजे प्रवास करताना तिकीट व पास काढण्यासाठी रोख रखमेचा व्यवहार टाळणे हा आहे. तसेच कुलाबा व वडाळा या आगारात ‘वन नेशन, वन कार्ड’ यासाठी उपयुक्त हार्डवेअरच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. हे कार्ड ‘एक देश, एक कार्ड’ आधारावर प्रवाशांना ‘एक कार्ड , एक तिकीट’ देण्यात येणार असून याने सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र यामधून तिकीटाचे पैसे वजा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.