Mumbai-Goa Highway: सध्या राज्यात वेगवेगळे महामार्ग विकसित होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) रविवारी रात्री ठाण्यातील 'मालवणी महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. यावेळी समारोप समारंभात बोलत असताना मुंबई-गोवा महामार्ग(Mumbai-Goa Highway) हा पुणे द्रुतगती आणि समृद्धी महामार्गासारखा विकसित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
पुनर्विकास करून हायस्पीड महामार्ग करणार
महाराष्ट्रातील पुणे आणि समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-गोवा(Mumbai-Goa Highway) हा महामार्ग लवकरत विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे पुनर्विकास करून हायस्पीड करण्यात येणार आहे. राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्गकडे(Sindhudurg) जाणाऱ्या कोस्टल रोडचेही(Coastal Road) रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सततच्या अपघातांमुळे(Accident) मुंबई ते गोवा महामार्ग सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये या महामार्गावर रस्ते अपघातात 23 जणांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटनांमुळे सरकारही सतत अडचणीत येते. यादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समृद्धी महामार्गाची जवाबदारी होती एकनाथ शिंदेकडे
नागपूर ते मुंबईला (Nagpur to Mumbai) जोडणाऱ्या समृद्धी महामार्गचे (Samruddhi Mahamarg) काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM. Narendra Modi) यांनी उद्घाटन केले होते. हा महामार्ग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. जेव्हा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि शिवसेना यांचे राज्यात युतीचे सरकार आले होते, त्याकाळात या महामार्गाची घोषणा करण्यात आली होती. या महामार्गाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई ते नागपूर हे अंतर खूपच कमी झाले आहे. पूर्वी 12 ते 15 तास प्रवासासाठी लागत होते, त्याऐवजी आता 7 ते 8 तासांत हा प्रवास पूर्ण होत आहे.