Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bharat Highways InvIT: भारत हायवेज इनव्हेस्टमेंट ट्रस्टचा 2000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे सादर केला प्रस्ताव

Bharat Highways InvIT

Bharat Highways InvIT: भारत हायवेज InvIT ने 2000 कोटींचा आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे. भारत हायवेज ही पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणारी ट्रस्ट आहे.

पायाभूत सेवा क्षेत्रातील भारत हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने (Bharat Highways InvIT) 2000 कोटींचे भांडवल उभारण्यासाठी सेबीकडे आयपीओचा प्रस्ताव सादर केला आहे. भारत हायवेजकडून अपूर्ण प्रकल्पांना अर्थसहाय्य करणे, कर्ज फेड करण्यासाठी हा निधी वापरला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

भारत हायवेजकडून विशेष उद्देश वहन कंपनीच्या माध्यमातून पोरंबदर द्वारका एक्सप्रेस वे, वाराणसी संगम एक्सप्रेस वे, जीआर सांगली- सोलापूर हायवे, जीआर अक्कलकोट सोलापूर हायवे, जीआर फगवाडा हायवे आणि जीआर गुंडुगोलानु देवरापल्ली हायवे या प्रकल्पांचे काम आहे.

जीआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (GDDHPL) या कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये भारत हायवेज InvIT ही गुंतवणूक ट्रस्ट स्थापन करण्यात आली होती. भांडवल उभारण्यासाठी ट्रस्टकडून 2000 कोटींचे युनिट्स इश्यू केले जाणार आहेत. या आयपीओतील 75% हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असून 25% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. भारत हायवेजच्या विशेष उद्देश वहन कंपनीचे 31 मार्च 2022 अखेर उत्पन्न 447.23 कोटी इतके होते.

InvITs म्हणजे काय?

इन्व्हिट (InvIT) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस) पडलेल्या भांडवलाचा पुनर्वापर करण्यास मदत करतात. या प्रकल्पांमध्ये रस्ते, ट्रान्समिशन लाइन किंवा नूतनीकरणयोग्य मालमत्तांचा समावेश आहे. इक्विटी व्यतिरिक्त InvITs दीर्घकालीन कर्ज वाढवण्यास मदत करतात. इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात. ज्याद्वारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात.