Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Mumbai : मुंबईत भाड्याच्या 2BHK फ्लॅटला मिळतीये सर्वाधिक पसंती

Real Estate

Image Source : www.financialexpress.com

Real Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Real Estate Mumbai : मुंबईमध्ये स्वतःच हक्काचं घरं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण रिअल इस्टेट प्रॉपर्टीचे वाढलेले दर आणि महागाई(Inflation) या कारणामुळे ते शक्य होईलच असे नाही. त्यामुळे बाहेरून मुंबईत कामानिमित्त राहायला आलेले लोक भाड्याच्या(Rented) घराला प्राधान्य देता. नुकताच मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या काळात एक सर्वे केला होता. या सर्वेनुसार मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती देताना पाहायला मिळत आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Magicbricks Rental Index चा अहवाल काय सांगतो?

मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या काळात एक सर्वेक्षण केले. 2022 सालातील चौथ्या तिमाहीत(Q4) मुंबईतील भाड्याच्या जागांची मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत 13.9 टक्क्यांनी कमी झाली असून जागांची उपलब्धता 3 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचनुसार प्रवासाच्या दृष्टीने ऑफिसचे लोकेशन घरापासून जवळ असल्याने अंधेरी पश्चिम(Andheri West)आणि अंधेरी पूर्व(Andheri East) या ठिकाणी भाड्याचं घर घेण्यासाठी लोकांची पसंती वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 
या संदर्भात मॅजिकब्रिक्सच्या सीईओ सुधीर पै(Sudhir Pai) यांच्या म्हणण्यानुसार, “2022 सालाच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतातील भाड्याच्या घरांची बाजारपेठ स्थिरपणे पूर्वपदावर येत होती. या काळात भाड्याच्या घरांची मागणी वाढली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर भाड्याच्या घरांच्या मागणीत पुन्हा वाढ होणे अपेक्षितच होते. त्यामध्ये गृहकर्जावरील(Home Loan) वाढते व्याजदर लक्षात घेता घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरांना पसंती देण्यास प्रोत्साहन मिळाले असावे.”

मुंबईत भाड्याच्या 2BHK फ्लॅट्सला 45 टक्के भाडेकरूंचे प्राधान्य 

मॅजिकब्रिक्सच्या अहवालानुसार, मुंबईत राहणारे जवळपास 45 टक्के भाडेकरू 2BHK घरांच्या शोधात आहेत. याचाच सरळ अर्थ असा होतो की ग्राहक 2BHK फ्लॅटला प्राधान्य देत आहेत. यावरून छोट्या आकारमानाच्या जागांची (500-1,000 चौरस फूट) मागणी आणि पुरवठा सर्वोच्च म्हणजे अनुक्रमे 52 टक्के आणि 42 टक्के आढळून आला आहे.

मॅजिकब्रिक्स(Magicbricks): 15 हून अधिक सेवा एकाच वेबसाईटवर

मालमत्तेची खरेदी-विक्री करणाऱ्यांना पारदर्शक पद्धतीने एकमेकांशी जोडून देणारा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म म्हणून मॅजिकब्रिक्सला(Magicbricks) ओळखले जाते. या वेबसाईटला प्रत्येक महिन्याला 2 कोटींहून अधिक जण भेट देतात आणि 15 लाखांहून अधिक सक्रिय मालमत्तांचे लिस्टिंग आहे. गृहकर्ज, भाडे भरणे, मुव्हर्स अँड पॅकर्स, कायदेशीर सहाय्य, मालमत्तेचे मूल्यांकन आणि तज्ज्ञ सल्ला अशा 15 हून अधिक सेवा मॅजिकब्रिक्स पुरवत असल्याने ग्राहक या वेबसाईटला प्राधान्य देतात.