Before House on Rent, this Take Care of Things: कोणत्याही नवीन भागात भाडयाने घर घ्यायचे असेल, तर नेहमीच मनात थोडी भिती निर्माणे होते. कसे, कुठे व कशाप्रकारचे घर घ्यायचे. तुमची नेमकी हीच भिती दूर करण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. यासाठी तुम्ही भाडयाने घर घेताना ही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
बजेटनुसार घर (A House on a Budget)
तुम्ही जर भाडयाने घर शोधत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा येणारा पगार ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. पगार म्हणजेच बजेटनुसार तुम्हाला परवडेल अशा किंमतीत भाडयाचे घर शोधले पाहिजे. एखादे भाडे बजेटमध्ये नसेल, तर तुम्हाला गरज असेल तेवढयाच खोल्यांचे घर पहा. यासोबतच एक खबरदारी घ्या की, घरभाडे हे वेळेवरच दिले गेले पाहिजे.
सर्व सोई-सुविधा (All Amenities)
भाडयाचे घर शोधताना तुमच्या गरजेनुसार सर्व सोई-सुविधा जवळ आहेत का, ते तपासून पहा. जसे की, तुमचे ऑफिस, मुलांच्या शाळा, बस- स्टॉप, हॉस्पिटल, भाजीपाला, मैदान, शॉपिंग मॉल्स, थिएटर या सर्व गोष्टी. जेणेकरून तुमच्या वेळेची व पैशांची मोठी बचत होईल. सोबतच तुम्ही भाडयाने घर घेत असलेल्या भागात मुख्यत पाणी व गॅस पुरवठा यांसारख्या मुलभूत सुविधा आहेत का, हे आवश्य तपासून पहा.
सुरक्षा (Security)
भाडयाने घर घेत असाल, तर तुमची सुरक्षा फार महत्वाची आहे. त्यामुळे घर घेताना सर्व सुरक्षा सेवा आहे का? याची चौकशी करा. जसे की, सिक्युरिटी, कॅमेऱ्यांची संख्या, ओळखीचे कुणी असेल तर त्यांना संपर्क करा. जर बैठी घराची निवड केली असेल, तर तो एरिया कसा आहे, किती सुरक्षित आहे, यांची चौकशी करावी.