Real Estate Property Tips: हल्ली मोठ्या प्रमाणावर लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक(Real estate investment) करताना पाहायला मिळत आहेत. ही गुंतवणूक कधी रहिवासी मालमत्तेत(Residential Property) केली जाते तर कधी व्यावसायिक मालमत्तेत(Commercial Property). तुम्हीही जागा, जमीन, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही बाबी तपासणे गरजेचे असते, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात, चला जाणून घेऊयात.
जागा, जमीन, प्लॉट खरेदी करताना ‘या’ बाबी लक्षात घ्या
- कोणतीही जमीन जोपर्यंत शेतजमीन(Farming Land) असते तोपर्यंत तो प्लॉट(Plot) म्हणून खरेदी करू नये. जर कोणी प्लॉट म्हणून डायव्हर्जनशिवाय(Diversion) शेतजमीन विकत असल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. महानगरपालिकेची मान्यता तपासल्या नंतरच बिल्डरकडून इमारत किंवा प्लॉट खरेदी करावा
- ज्या जमिनीवर प्लॉट किंवा इमारत विकली जात आहे, त्या जागेची मालकी तपासून घ्या. ती जमीन कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे, हेही पडताळून घ्या. ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन नोंदणीकृत(Registration) आहे, त्याच व्यक्तीच्या स्वाक्षरीने विक्रीपत्र करून घ्यावे, अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागेल
- मालमत्ता खरेदी करताना, सर्वप्रथम त्याचे नामांतरण तपासणे गरजेचे असते. महानगरपालिका(Municipal Corporation) व ग्रामपंचायतीच्या(Gram Panchayat) खात्यावर मालमत्ता कोणत्या नावाने नोंदवली आहे हे तपासून घ्यावे. महानगरपालिकेच्या मालमत्ता कर खात्यात मालमत्तेची कोणत्या नावाने नोंद झाली आहे. त्या मालमत्तेचा कर कोणाच्या नावावर भरला जातो, हे देखील तुम्ही तपासून घ्या
- ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या नोंदणीमध्ये यासंदर्भात नोंद आहे का? तेही तपासून घ्या. कोणत्याही मालमत्तेचे नामांकन हे गरजेचे असते. कारण, सरकारी नोंदीमध्ये ती व्यक्ती मालमत्तेची मालक असून अनेक प्रकरणांमध्ये, नामनिर्देशन त्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशी अनेक प्रकरणे पाहायला किंवा ऐकायला मिळाली आहेत ज्यामध्ये मालमत्तेचा मालक एक असून नावाचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशी मालमत्ता खरेदी करू नये, असे तज्ज्ञ सांगतात
सर्व बाबींची पडताळणी करून मालमत्ता घ्यावी
संबंधित जागा, जमीन त्या व्यक्तीच्या नावावर कशी झाली, याचे तपशील तपासावेत. कायदेशीर सर्च रिपोर्ट बनवून घ्यावा आणि वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी. महानगरपालिका व राज्य शासनाच्या आरक्षणासंदर्भातील कागदपत्रे तपासावेत. मालमत्ता कोणत्या झोनमध्ये येते, जसे की येलो, ग्रीन इ. हे सुद्धा पाहून घ्या. तसेच भूसंपादनासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रे पडताळावीत.